आमदार संग्राम जगताप यांच्या विजयासाठी सुजय विखे मैदानात
आमदार संग्राम जगताप यांची विकास यात्रा आज वार्ड क्रमांक दोन मध्ये पार पडली, या विकास यात्रेस या वार्डातील नगरसेवक सुनील त्र्यंबके, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुद्धे, यांनी या विकास यात्रेचे अतिशय छान नियोजन केले होते.

Sujay Vikhe | सुजय विखे यांनी आमदार संग्राम यांच्या विषयी केले मोठे भाकीत..!
लोकसभेच्या पराभवानंतर नगर मध्ये पहिल्यादाच सुजय विखे Sujay Vikhe आणि संग्राम जगताप हे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले, सुजय विखे यावेळी असे म्हणाले लोकसभेमध्ये मला नगर शहराने लीड दिली आहे, इथे आमचे अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, आणि ते आत्ता विधानसभेसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहणार आहेत .
Table of Contents
यावेळी बोलताना सुजय विखे यांनी मोठे भाकीत केले आहे, आमदार संग्राम जगताप हे ५०००० च्या मताधिक्याने निवड येणार आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे, विरोधकांना हे समजत नाही कि आपण कोणता मुद्दा घेऊन जनतेसमोर जावे, कारण त्यांनी एकही विकास काम या नगर शहरात केले नाही, त्यामुळे टीका करणे हाच त्यांचा प्रचार आहे असेच म्हणावे लागेल.
नगर मध्ये आम्ही सर्वजण महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार . संग्राम जगताप यांचा प्रचार करणार आहोत, आणि महायुतीचाच उमेदवार विजयी होणार आहे.
