Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती !

Tunisha Sharma: वय अवघं वीस वर्ष अन् करोडोंची मालकीण; तुनिषा शर्माने आपल्या मागे सोडली ‘इतक्या’ कोटींची संपत्ती !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 26, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मानं वसईत एका मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडलीये. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी अभिनेत्रीनं हे टोकाचं पाऊल उचलल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. इतक्या कमी वयात आपल्या अभिनयाच्या बळावर मालिका आणि चित्रपट विश्वात आपली हक्काची जागा निर्माण करणारी अभिनेत्री जग सोडून गेल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जातेय. तुनिषानं २० व्या वर्षी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत चांगली कमाई केली होती.

तुनिषा शर्मा अलिबाबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. याच मालिकेच्या सेटवर तिने आपलं आयुष्य संपवलं. येत्या ४ जानेवारी रोजी अभिनेत्री तुनिषा शर्मा आपला वाढदिवस साजरा करणार होती. मात्र, त्या आधीच तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला. तुनिषानं आत्महत्या का केली, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तुनिषाचा जन्म चंदीगडमध्ये झाला होता. तिचं शालेय शिक्षण देखील चंदीगडमध्येच झालं. तुनिषाला लहानपणापासूनच अभियानाची आणि डान्सची खूप आवड होती. तिनं आपलं करिअर याच क्षेत्रात करायचं ठरवलं होतं. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी ती मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तुनिषाने नाव तर कमावलंच, पण भरपूर संपत्तीही कमावली.



तुनिषाने इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून तिचा अभिनय प्रवास सुरू केला होता. अवघ्या १४ व्या वर्षी तुनिषाने ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत ती अनेक लोकप्रिय शोमध्ये झळकली. तुनिषानं ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘गब्बर पुंचवाला’, ‘भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप’, ‘इंटरनेट वाला लव्ह’ आणि ‘इश्क सुभानल्लाह’ या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. केवळ छोट्या पडद्यावरच नाही तर चित्रपटांमध्येही तिने आपलं नशीब आजमावलं. तुनिषा ‘बार बार देखो’, ‘कहानी २’, ‘दबंग ३’ या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली होती. कतरिना कैफच्या ‘फितूर’ सिनेमातीही कतरिनाच्या बालपणीची भूमिका साकारून तुनिषाने खूप वाहवा मिळवली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्पावधीतच यशाची शिखरे गाठणारी तुनिषा शर्मा तिच्या स्वत:च्या आलिशान घराची मालकिन होती. तुनिषाच्या घराची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगण्यात येतंय. आलिशान घरासोबतच तुनिषा शर्मा अनेक आलिशान गाड्यांचीही मालकीण होती. तुनिषा तब्बल २ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण होती. वयाच्या २०व्या वर्षात तिने मिळवलेले हे यश वाखाणण्याजोगे होते.



दरम्यान, तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यावर तिची आईने शिजान खानवर अतिशय गंभीर आरोप केले. तुनिषाच्या आईनं सांगितलं की, शिजान आणि तुनिषा रिलेशनशीपमध्ये होते. शिजाननेच आपल्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं. तुनिषाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर शिजान खान याला अटक करण्यात आली असून, त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. दरम्यान, या तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात आता काय समोर येतं हेच पाहणं महत्वाचं आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleस्वामी चिंचोली येथे बेकादेशीर मुरम उत्खनन चालूच महसूलची कारवाई दिखाव्या पुरतीच
Next Article पडळकरांचा मोठा खुलासा; बारामतीच्या बैठकीत ठरल्या होत्या ‘या’ गोष्टी !
mahalokwani
  • Website

Rahul sangle| तपोवन रोड परिसरात बंदुकीतून फायर करणारे ; राहूल सांगळे आणि भीमराज आव्हाड अखेर जेरबंद, असा रचला सापळा

Ahilyanagar palika| महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजणार ; पालिका प्रशासनाकडून प्रभाग रचनेचे काम युद्ध पातळीवर सुरु..!

Sandip thorat |संदिप थोरात याचा पाय आणखी खोलात; भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

indor raja murder| हनिमूनवर असताना पत्नीनीने केले हे कांड; हे कारण आलं समोर

ladki bahin hapta | लाडकी बहिण’ योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट; असे असल्यास अपात्र होणार लाडकी बहीण

Ahilyanagar| अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात; एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

Ajit Pawar| अजितदादा पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी सोडली साथ; या पक्षात प्रवेश

credit card| क्रेडिट कार्ड आणि गॅसचे 1 जूनपासून नियम बदलणार, पहा कसे असणार नियम

Vaishnavi Death| वैष्णवीचा मृत्यू घरातले पाचही जण…. वकिलाचा मोठा गौप्यस्फोट काय ?

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.