महालोकवाणी न्यूज:
कोरोनानंतर अनेक लोक डिजिटल खरेदी आणि पेमेंटकडे वळली आहेत. त्यामुळे आता बऱ्यापैकी देवाणघेवाण ही डिजिटल पेमेंट म्हणजे Upi Payment द्वारे किंवा पेटिएमद्वारे केली जाते. आता Upi Payment द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेमेंट करण्याची पद्धत बदलली असून आता सारखा पिन अपलोड करावा लागणार नाही.

युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड म्हणून उदयास आला आहे. लहान UPI पेमेंट सोयीचे करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सप्टेंबर 2022 मध्ये UPI Lite वैशिष्ट्य सांगितली आहेत.
आता पेटीएमनेही हे फीचर आपल्या यूजर्ससाठी आणले आहे. या फीचरची खास गोष्ट म्हणजे 200 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी तुम्हाला 4 किंवा 6 अंकी UPI पिन टाकावा लागणार नाही.

पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) ने लहान मूल्याच्या UPI व्यवहारांसाठी UPI Lite वैशिष्ट्य सुरू केले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, या फीचरद्वारे यूजर्स एका क्लिकवर जलद रिअल-टाइम व्यवहार करू शकतील. PPBL ही UPI Lite फीचर लाँच करणारी पहिली पेमेंट बँक आहे.
या फीचरची खास गोष्ट म्हणजे आता दररोज होणाऱ्या छोट्या व्यवहारांमुळे बँकेचे पासबुक भरलं जाणार नाही. हे व्यवहार आता फक्त पेटीएम बॅलन्स आणि हिस्ट्रीमध्येच तुम्हाला दिसतील ते बँकेच्या पासबुकवर प्रिंट होऊ येणार नाहीत.
