नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला.
औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली. त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात काही पोलीस जखमी झाले. या हल्ल्यामुळे तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटला. काल रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हा राडा झाला. औरंगजेबाच्या कबर हटवण्याच्या मागणीच्या निदर्शनानंतर नागपुरात हिंसा भडकली. त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात काही पोलीस जखमी झाले. या हल्ल्यामुळे नागपूरमध्येतणाव निर्माण झाला असून पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.