Weather Alerts : मिचाँग चक्रीवादळ (Michaung Cyclone)आता चेन्नईपासून दूर सरकलंय. हे वादळ किनाऱ्यालगत उत्तरेकडे सरकल्याचं हवामान विभागानं सकाळी जाहीर केलं होतं. पण या चक्रीवादळामुळे चेन्नई परिसरात रविवार आणि सोमवारी मिळून 36 तासांत 40 सेंटीमीटर एवढा पाऊस पडलाय.
हे हि वाचा 👉🏻: Rain Update |राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे सावट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
या चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आतापर्यंत 12 जणांचा बळी घेतला आहे. राज्यात या वादळाचा परिणाम दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामान ढगाळ राहिल. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर अन्य ठिकाणी हवामान सामान्य राहिल असा अंदाज आहे.
The scs “michaung” over south coastal AP moved northwards during past 06 hours. The latest observation indicates that the lanfall process is completed. It lay centered at 1530 hours ist of today over south coastal AP, about 20 km WSW Of bapatla and 45 km NNE of Ongole. pic.twitter.com/xQFOg4wAMh
— India Meteorological Department (@Indiametdept) December 5, 2023
महाराष्ट्रावर मिचाँग हे चक्रीवादळ थेट धडकणार नाहीये, पण त्याच्या प्रभावामुळे 6 आणि 7 डिसेंबरला विदर्भातील काही भागांत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसंच महाराष्ट्र आणि मध्य भारतातील तापमानावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
हे चक्रीवादळ आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यांच्यामुळे यंदा डिसेंबरमध्ये राज्यातलं तापमान नेहमीपेक्षा थोडं जास्त राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे मुख्य संचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी काही दिवसांपूर्वी वर्तवला होता.
जिल्ह्यात हुडहुडी वाढणार
जिल्ह्यात पुढील ७२ तास सकाळी हलके धुके तसेच आकाश दुपारी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सात तारखे नंतर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे . तसेच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किमान तापमानात आजपासून ते नऊ तारखेपर्यंत जिल्ह्यात दोन ते चार डिग्री सेल्सियस तर शहरात दोन ते तीन डिग्री सेल्सियस घट होण्याची शक्यता आहे.