पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन R Ashwin वर्ल्ड रेकॉर्ड World Record आपल्या नावावर केलाय.
डोमिनिका | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून झाली. या दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन R Ashwin वर्ल्ड रेकॉर्ड World Record आपल्या नावावर केलाय. आर अश्विन R Ashwin अशी कामगिरी करणारा क्रिकेट विश्वातील पहिलाच खेळाडू ठरलाय. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला अशी कामगिरी करता आली नव्हती.

नक्की वर्ल्ड रेकॉर्ड काय?
विंडिजकडून बॅटिंगसाठी कॅप्टन क्रॅग ब्रॅथवेट आणि टॅगेनारायण चंद्रपॉल ही जोडी सलामीला आली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. आर अश्विन R Ashwin याने ही जोडी फोडत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. अश्विनने चंद्रपॉलला क्लिन बोल्ड केलं. यासह अश्विनने वर्ल्ड रेकॉर्डची World Record नोंद केली.
Tata। टाटा समूह भारतात तयार करणार iPhone15 आणि iPhone15Plus; किंमत असणार फक्त..
R Ashwin बाप-बेट्याची विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. टॅगेनरिन हा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल याचा मुलगा आहे. अश्विनने टॅगेनरिनला 12 धावावंर आऊट केलं. टॅगेनरिनने 44 बॉलमध्ये ही खेळी केली. दरम्यान अश्विनने शिवनारायण चंद्रपॉल याला 2011 मध्ये एलबीडबल्यू आऊट केलं होतं.
Table of Contents
विंडिजचा अर्धा संघ तंबूत
दरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांनी विंडिजला झटपट धक्के दिले आहेत. आर अश्विन R Ashwin आणि रविंद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर याने 1 विकेट घेत फिरकी जोडीला चांगली साथ दिली. त्यामुळे विंडिजची 31.5 ओव्हरमध्ये 5 बाद 76 अशी झाली. आता टीम इंडियाच्या गोलंदाजांचा विंडिजला झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न असणार आहे.
The moment Ravi Ashwin created history!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 12, 2023
The first Indian to pick the wicket of father (Shivnarine) and son (Tagenarine) in Tests. pic.twitter.com/nvqXhLz0ze
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन R Ashwin , शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.
