Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » जामखेड ब्रेकिंग न्यूज| लैगिक शोषण प्रकरणी डॉ. भास्कर मोरेचा जामीन फेटाळला, मोरेवर अटकेची टांगती तलवार, अटकेसाठी पोलीस पथक रवाना.!

जामखेड ब्रेकिंग न्यूज| लैगिक शोषण प्रकरणी डॉ. भास्कर मोरेचा जामीन फेटाळला, मोरेवर अटकेची टांगती तलवार, अटकेसाठी पोलीस पथक रवाना.!

mahalokwaniBy mahalokwaniMay 29, 2023Updated:May 29, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगर :

      जामखेड येथिल रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर संस्थेच्या रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी.फार्म.सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील १९ वर्षीय पिडीतेच्या लैगिक शोषण प्रकरणी भास्कर मोरेने दाखल केलेला अटकपूर्व जामीन श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला असून अटकेच्या भितीने मोरे फरार झाला आहे. 

    या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या मेडिकल कॉलेजच्या बी. फार्मसी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थींनींचा लैगिक शोषण केल्या प्रकरणी संस्था चालक भास्कर मोरेवर जामखेड पोलीस स्टेशनला दि. ४ मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 यामुळे जामखेड तालुक्यासह संपुर्ण राज्यात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान दि. ४ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनंतर मोरेच्या काॅलेजवर वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशपुर्व प्रवेशासाठीची स्पर्धा परिक्षेचे कारण दाखवत मोरेने श्रीगोंदा सत्र न्यायालयापुढे तात्पुरत्या जामीन साठी अर्ज दाखल केला व त्यास तात्पुरता जामीन मिळालाही. यामुळे काही काळ का होईना पण जामखेड पोलीसांबाबत या प्रकरणी जनतेच्या मनात अविश्वास निर्माण झाला होता. मात्र यानंतर 

कोर्टात काय घडले वाचा👇
1) मागील तारखेला पीडित मुलीने स्वतः उपस्थित राहून शपथपत्र दाखल केले .
1) तात्पुरता जमीन मिळवताना नीट परीक्षेचा आधार घेत कोर्टाला खोटी माहिती पुरवली . संस्था अध्यक्ष व नीट परीक्षा याचा काही संबंध नसतो . तरी तात्पुरता जामीन मिळाला कारण तेव्हा पोलिसांनी सक्षम पणे बाजू मांडली नाही .
3) पीडित मुलीच्या वतीने दि. 24/5/2023 रोजी वकीलाने सक्षम बाजू मांडली गेली म्हणून न्यायालायाची दिशाभूल लक्षात आली.
4) जामखेड तालुक्यातील समाजिक संघटनांनी पोलिसांवर दबाव वाढवला व रस्त्यावर उतरले त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला व आज पोलिसांनी सक्षम पणे बाजू मांडली .
5) सोशल मीडिया पोर्टल व फक्त दोन प्रिंट मीडिया पेपर यांनी बाजू लावून धरली .

 जामखेड पोलीसांनी केलेल्या जबाब, पंचनामे तसेच आवश्यक योग्य कार्यवाहीमुळे आज दि. २९ रोजी भास्कर मोरेचा जामीन न्यायालयाकडून फेटाळला असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. 

  दरम्यान भास्कर मोरेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर मुलीला योग्य ते सहकार्य करत खर्डा चौकात तिव्र निदर्शने व अंदोलने व जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

मुलीने दाखल केलेल्या लैगिक शोषण गुन्हा प्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई करावी तसेच काॅलेज मधील मुलामुलींची विविध पध्दतीने केलेली पिळवणूक व शासनाची दिशाभूल करून विविध शाखांना मिळविलेल्या परवानग्यांसह संस्थेत चालणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करून डॉ. मोरे विरूद्ध कठोर कारवाई करावी यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालया समोर महाराष्ट्र दलित परिषदे मार्फत संजय जाधव यांनी उपोषण केले

दि. २३ मे रोजी जामखेड येथिल खर्डा चौक येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व राष्ट्रीय समाज पक्षाचे अहमदनगर युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

तर आज दि. २९ रोजी वंचीत बहुजन आघाडीचे आतिश पारवे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणाचे अंदोलन करण्यात आले. 

डाॅ. भास्कर मोरे विरूद्ध दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत असून पोलीस नाईक अजय साठे हे त्यांना सहकार्य करत आहेत. . 

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleचिंचपूर पांगुळ येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी.!
Next Article पुढील ४८ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट.!
mahalokwani
  • Website

Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त; आणखी कमी होणार का भाव?

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरचे ₹1500 कधी जमा होणार? जाणून घ्या मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.