मिरारोडमध्ये मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. व्यक्तीने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या आपल्या पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. प्रियसी ही अहमदनगर येथे काही दिवस वास्तव्यासाठी होती,
आरोपीने अहमदनगर येथील मयत महिलेच्या मृतदेहाची तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवायचा आणि त्यानंतर तो ते मिक्सरमध्ये बारीक करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक करुन घरातील हत्येसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे.

मीरा भाईंदर शहर हत्येच्या या घटनेनं पूर्णपणे हादरुन गेलं आहे. मीरा भाईंदरच्या उड्डाणपूलाच्या शेजारी गीता आकाशदिप या सोसायटीत गीता नगर फेस – 7 च्या “जे” विंग मधील सदनिका क्रमांक 704 मध्ये ही क्रूर घटना घडली आहे. या सदनिकेत मनोज साने वय 56 आणि त्याची अहमदनगर येथील रुम पार्टनर मयत सरस्वती वैद्य वय 32 हे दोघे राहत होते.
मागच्या तीन वर्षांपासून हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येथे राहत होतं. या इमारतीत राहणाऱ्या शेजारच्या लोकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. नयानगर पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर या भयानक घटनेचा पर्दाफाश झाला.आरोपी हा अनेक वेळा अहमदनगर जिल्ह्यात आलेला आहे
२०१४ मध्ये तेथे त्याची ओळख सरस्वती वैद्य बरोबर झाली. ती अनाथ होती. तेव्हापासून ते एकत्र राहत होते. सरस्वती अहमदनगरच्या जानकईबाई आपटे अनाथाश्रमात रहात होती. पोलीस तेथून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. हत्येनंतर मनोज साने एकदम शांत असून तो पोलिसांची दिशाभूल करत आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नयानगर पोलीस ठाण्यात राञी उशीरापर्यंत सुरु होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मयताचे तुकडे तुकडे केले होते. हे तुकडे कटर मशीनने केल्याची माहिती समोर येत आहे.
ही हत्या का करण्यात आली, याची अधिकृत माहिती चौकशीनंतर समोर येईल. सुञांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मनोज सानेला मयत सरस्वती वैद्यचं कुठेतरी अफेअर सुरु असल्याचा संशय येत होता. त्यामुळे मागील 3 ते 4 दिवसांपासून या दोघांचं भांडण सुरु होतं.
मयत सरस्वती वैद्य हिने दोन ते तीन दिवसांपूर्वीच विष पित आपलं जीवन संपवलं होतं. तिच्या आत्महत्येस पोलीस आपल्याला कारणीभूत ठरवतील या भितीने त्याने मयत सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची शक्कल लढवली. सुञांच्या माहितीनुसार आरोपीने मयताच्या मृतदेहाचे विल्हेवाट लावण्यासाठी कटर मशीनने तुकडे तुकडे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो ते तुकडे कुकरमध्ये बॉईल करायचा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचा
त्याने सोसायटीच्या मागील बाजूच्या गटारातही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी तो आपल्या बाईकचा वापर करायचा. पोलिसांनी राञी उशिरा हत्येसाठी वापरण्यात आलेलं घरातील सर्व सामान तसंच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात येणारी बाईकही जप्त केली आहे. सध्या या विषयावर अधिकृत माहिती देण्यास पोलीस टाळत आहेत.
या हत्याकांडाच्या अधिक माहितीसाठी मुंबई पोलीस अहमदनगर येथील बालिकाश्रम रोड तसेच जानकीबाई आपटे अनाथ मुलींचे वस्तीगृह याठिकाणी येऊन चौकशी करून गेलेले आहेत
