Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार राम शिंदे आक्रमक; प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा फाडत, प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार निलंबित !

आमदार राम शिंदे आक्रमक; प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा फाडत, प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार निलंबित !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 27, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड : कर्जत – जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदार राम शिंदे कमालीचे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या गेल्या अडीच तीन वर्षांच्या काळातील अनियमितेचा बुरखा फाडण्यासाठी शिंदे यांनी कंबर कसली आहे.नागपुर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित करत राम शिंदे यांनी प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बुरखा टराटरा फाडला आहे.

आमदार राम शिंदेंच्या दणक्यामुळे सहकार विभागातील एक अधिकारी 26 डिसेंबर रोजी निलंबित झाल्यानंतर 27 डिसेंबरला सुद्धा कर्जतमधील दोन अधिकारी निलंबित झाले आहेत. सरकारच्या या कारवाईमुळे कर्जत – जामखेडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

फुटबॉलपटू पेले यांना जीवघेणा कोलन कॅन्सर; ‘ही’ आहेत लक्षणं, पहा काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय?

आमदार राम शिंदे यांच्या मागणीनंतर कर्जत उपविभागाचे प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले आणि कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निलंबित करण्याची घोषणा 27 डिसेंबर रोजी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनात केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कर्जत तालुक्यातील गौण खनिज संदर्भात कारवाई करण्यात कुचराई केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्ती करण्यात येणार आहे. एक महिन्याच्या आत सदर चौकशी समिती सरकारला अहवाल देईल. त्यानंतर सरकार पुढील कारवाई करेल अशी घोषणा महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना केली.

▶ कर्जतमधील नेमकं प्रकरण काय ?

कर्जत तालुक्यात एकही अधिकृत खडीक्रेशर नसताना अधिकारी यांच्याशी संगनमत करुन रात्री मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जाते. यात वन्यजीव कायद्याचेही उल्लंघन होत आहे. याबाबत आमदार राम शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शासनाकडे झाली असून, त्यावर काय कार्यवाही झाली? अशीही विचारणा त्यांनी केली होती.

या प्रश्नाला महसूलमंत्री विखें यांनी लेखी उत्तर दिले आहे. कर्जत तालुक्यात ११ क्रशरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली आहे. त्यापैकी खडीक्रशर धारकांवर अवैध उत्खननप्रकरणी दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. या तालुक्यात सात खाणपट्ट्यांना मंजुरी आहे. मात्र माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र संवेदनशील असल्याने तेथील पाच खाणपट्टे बंद स्थितीत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीबाबत निवेदन प्राप्त झाले असल्याचे विखे यांनी उत्तरात म्हटले होते. परंतू यावर आमदार राम शिंदे समाधानी झाले नव्हते. त्यामुळे आमदार राम शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित करत या प्रकरणात कारवाईची मागणी केली होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleआदित्य ठाकरे तुरुंगात जाणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गंभीर इशारा !
Next Article अहमदनगर ब्रेकींग: शाळकरी विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन – राजकीय पक्षाच्या युवा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.