Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » आमदार राम शिंदे यांच्या माध्यमातून होणार कर्जत-जामखेडचा कायापालट नियोजन समितीकडे केली 2 कोटींच्या निधीची मागणी.

आमदार राम शिंदे यांच्या माध्यमातून होणार कर्जत-जामखेडचा कायापालट नियोजन समितीकडे केली 2 कोटींच्या निधीची मागणी.

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 6, 2023Updated:February 6, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

26 गावामध्ये सिंगलफेज आणि थ्री फेज डिप्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदेंचा पुढाकार

जामखेड :

लेखाशिर्ष 2515 मधून कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी 5 कोटींचा निधी आणल्यानंतर काही तास उलट नाही तोच मतदारसंघातील 26 गावांमधील सिंगलफेज आणि थ्री फेज डिप्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे पुढे सरसावले आहेत. मतदारसंघातील शेतकऱ्यांची अन् जनतेची विजेच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी, आमदार प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयाने जिल्हा नियोजन समितीकडे 2 कोटींच्या निधीची मागणी करणारा प्रस्ताव सादर केला आहे.

आपल्या मंत्रिपदाच्या काळात कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असलेल्या आमदार प्रा राम शिंदे यांच्या विकास कामांचा झंझावात पुन्हा एकदा मतदारसंघात निर्माण झाला आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार आता घेतला आहे. मतदारसंघात नव्या डिप्या बसवाव्यात अशी मागणी शेतकरी, नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे केली होती, या मागणीची आमदार प्रा राम शिंदे यांनी तातडीने दखल घेत मतदारसंघातील 26 गावांमध्ये नव्या डिप्या बसवाव्यात यासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे.

हे ही वाचा

शांत झोप लागत नाही का ? ‘या’ टिप्स करा फॉलो, जाणवेल फरक!

कर्जत-जामखेड मतदारसंघातील 26 गावांमधील डिप्यांच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजूरी देऊन 01 कोटी 80 लाख रुपयांचा निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करुन द्यावा, असे मागणी पत्र आमदार प्रा राम शिंदे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन अधिकारी यांना दिले आहे.

“यंदाच्या रब्बी हंगामात मतदारसंघातील शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने वीज मिळाली नाही, एक सर्किट सोडून एक सर्किट चालवावं लागलं, डिप्यावर लोड येत होता, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांची या त्रासातून सुटका व्हावी यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात अधिकच्या डिप्या मंजुर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. नव्या डिप्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या या निर्णयामुळे बळीराजा सुखावला आहे. जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.”

आमदार प्रा राम शिंदे यांच्या स्थानिक विकास निधीतून जामखेड तालुक्यातील सुचवलेले कामे खालील प्रमाणे

1) पिंपरखेड : लबडे मळा गट नंबर 333 मध्ये थ्री पेज डिपी
2) बाळगव्हाण : पवारवस्ती सिंगल फेज डिपी
3) जायभायवाडी : श्रीरामनगर जायभायवाडी येथे डीपी
4) हाळगाव : गट नंबर 156 थ्री फेज डिपी
5) खर्डा : गोपाळघरेवस्ती गट नंबर 133 येथे 25 ची डिपी
6) फक्राबाद: खडक शेतवस्ती येथे डिपी
7) सतेवाडी : जुने गावठाण येथे डिपी
8) चुंबळी : गट नंबर 35 येथे थ्री फेज डिपी
9) धोत्री : अडाले वस्ती येथे 100? केव्ही डीपी
10) जामखेड: वीटकर खडी क्रेशर जवळ गट नंबर 514 येथे थ्री फेज डीपी

आमदार प्रा राम शिंदे यांनी स्थानिक विकास निधीतून कर्जत तालुक्यातील सुचवलेले कामे खालीलप्रमाणे

1) पिंपळवाडी : इनामवस्ती येथे सिंगलफेज डिपी
2) कुळधरण : राहूल निंबोरे वस्ती येथे थ्री फेज डिपी
3) कोरेगाव : तुरकुंडेवाडी येथे सिंगल फेज डिपी
4) कुंभेफळ : पप्पु धोदाड थ्री फेज डिपी
5) चापडगाव : दत्त नगर सिंगल फेज डिपी
6) पाटेगाव : संतोष महारनवर – अर्जुन महारनवर डिपी
7) डिकसळ : वारंगळे वस्ती
8) बाभूळगाव खालसा : सुतारवस्ती येथे सिंगल फेज डिपी
9) गुरव पिंपरी : भगत मांढरे वस्ती येथे थ्री फेज डिपी
10) खरंगेवाडी : मधुकर कुंडलिक गट नंबर 220 मध्ये थ्री फेज डिपी
11) नागमठाण: गावामध्ये वाड्यावर सिंगलफेज डिपी
12) चांदे बुद्रुक: थोरात वस्ती येथे सिंगल फेज डिपी
13) चांदे खुर्द : गंगावणेवस्ती, तिखेवस्ती, गावडेवस्ती, सिंगल फेज डिपी
14) तिखी : तिखी गावठान सिंगल फेज डिपी
15) गणेशवाडी : अहिल्यानगर येथे सिंगल फेज डिपी
16) खेड : गावठाण डिपी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleया राष्ट्रवादी नेत्याची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस; भाजपाच्या या नेत्याचे धक्कादायक विधान
Next Article खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असताना फरार झालेल्या आरोपीस सिने स्टाईल अटक..!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.