महा लोकवाणी न्यूज
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
डिकसळ तालुका इंदापूर ते कोंढार चिंचोली तालुका करमाळा . येथील ब्रिटिश कालीन पुलाला मोठे भगदाड पडलेले आहे कोणत्याही क्षणी हा पुल कोसळू शकतो अशी अवस्था निर्माण झालेली आहे करमाळा तालुक्यातील 30 ते 40 गावांना .जोडणारा हा पुल ब्रिटिश कालीन आहे या पुलावरुन 30 ते 40 गावातून ऊस व ईतर जड वाहतूक केली जात आहे या पुलाचे आयुष्यमान संपलेले आहे तरीसुद्धा जीवघेणी वाहतूक या पुलावरून मूठभर राजकीय पुढार्यांच्या मनमानी कारभारामुळे वाहतुकदारांच्या आणी नागरीकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
भोगी,दिवशी या गोष्टी केल्यास होईल फायदा
सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा यांनी मागील महिन्यात बॅरॅकेट बसवून जड वाहतूक बंद केली होती परंतु रात्रीच्या वेळेस गॅस कटरने सदरचे बॅरिकेट कापून घेऊन जड वाहतूक सुरू केली असा आरोप कोंढार चिंचोली चे माजी सरपंच साळुंखे यांनी केला आहे तात्काळ वाहतूक बंद न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी परिस्थिती उद्भवलेली आहे हा पूल जर कोसळला आणि आणि रस्ता बंद झाला तर या गावातील लोकांना 35 ते 40 किलोमीटर लांबून भिगवन तालुका। ईंदापूर बाजारपेठेत यावे लागणार आहे. आणि .भिगवण तालुका इंदापूर येथे येणाऱ्या शाळेतील मुलांचे फार मोठे नुकसान होणार आहे त्यांचा वेळ वाया जाऊ शकतो बड्या राजकीय नेत्यांच्या स्वार्थासाठी सर्व सामान्य जनतेला मात्र नाहक त्रास सोसावा लागु शकतो दुर्दैवाने येथे कोणतेही जिवित हानी झाली नाही परंतु अशीच जडवाहतूक चालू राहिल्यास मोठी जिवित हानी नाकारता येत नाही.

आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या पुलासाठी 55 कोटी रुपये मंजूर झाले असून सदरच्या कामाचे टेंडर जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणार आहे व लवकरच नवीन पुलाचे काम सुरू होईल..करमाळा तालुक्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कुंडलिक उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले तात्काळ वाहतूक बंद करण्याची कारवाई सुरू केलेली आहे.
