संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी . भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. या पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके विपुल प्रमाणात तयार झालेली असतात.
काँग्रेसच्या माजी. मुख्यमंत्र्याचा मुलगा आता भाजपच्या वाटेवर? कारणही आलं समोर !
इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून वर्षानुवर्ष पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते
भोगी साजरी मागील उद्देश –
शेतात आलेल्या नविन पिकांचा उपभोग घेणे म्हणजे भोगी. या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या जसे पावट्यांचे दाणे, वांगी , गाजर , बोर, वाटाणा, पावटा , पापडी अशा विविध भाज्या एकत्र करून त्यात तिळाचा कूट घालून ती भाजी तयार करतात. तर काही भागात पालेभाज्यांची मिक्स भाजी केली जाते. त्या बरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, लोणचे, पापड, तिळाची चटणी खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडी असा बेत असतो.
