Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कार-बाइक्सऐवजी बोटीने प्रवास करतात लोक; वाचा जगातील ‘या’ अजब गावाची गजब कहाणी !

कार-बाइक्सऐवजी बोटीने प्रवास करतात लोक; वाचा जगातील ‘या’ अजब गावाची गजब कहाणी !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 26, 2023Updated:March 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जगातली अनेक ठिकाणं वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणं समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखली जातात, काही ऐतिहासिक महत्त्वामुळे ओळखली जातात, तर काही ठिकाणी स्वच्छता आणि सुंदरता इतकी असते की आपली नजर तिथून हटत नाही. नेदरलँड्समध्ये असं एक गाव आहे, जिथे रस्तेच नाहीत. होय. तुम्ही बरोबर वाचत आहात, तिथे रस्ते नसलेलं गाव आहे आणि ते गाव खूपच सुंदर आहे. या गावात कार, बाइक यासारखी वाहनंही नाहीत.

या गावात राहणारे लोक त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी बोटीचा वापर करतात. नदीकाठी असलेलं हे गाव सर्वात लहान गाव आहे. इथलं प्रदूषणमुक्त नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी दूरवरून लोक भेटी देतात. या गावातली टुमदार घरं आणि नदीतलं स्वच्छ पाणी पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. आज या गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
गावात एकही रस्ता नाही.

आपण नेदरलँडमधील गिथॉर्न या छोट्याशा गावाबद्दल बोलत आहोत. हे गाव पाहिल्यास इथं अप्सरा राहतात, असं वाटेल. हे गाव इतकं रमणीय आहे की ते बघून तुम्हालाही त्याची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही.

✦ नेदरलँड्सचं व्हेनिस अशी ओळख

या गावात एकही रस्ता नाही. त्यामुळे याला नेदरलँड्सचं व्हेनिस असंही म्हटलं जातं. गावात रस्ते नाहीत, त्यामुळे लोक कार किंवा बाइक खरेदी करत नाहीत. इथे फक्त बोटीचा वापर केला जातो.

✦ दूरवरून लोक फिरायला येतात

इथे फक्त बोटी दिसतात. त्यामुळे लोक दुरून इथं फिरायला येतात. या ठिकाणचं सौंदर्य पाहून लोक इथे येण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

✦ कोणतही प्रदूषण नाही

या गावात रस्ता नाही त्यामुळे इथे कार किंवा बाइक धावताना दिसत नाहीत. परिणामी गावात प्रदूषण अजिबात दिसत नाही. इथं अनेक लाकडी पूलही बांधण्यात आले आहेत.

✦ गावात आहेत 180 पूल

या गावात एकूण 180 पूल आहेत, तसंच या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे तीन हजारच्या जवळपास आहे. इथे प्रत्येक कुटुंबाची स्वतःची बोट आहे. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फ पडतो, त्यामुळे इथे आईस स्केटिंगचा आनंदही लुटता येतो. हे स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त गाव पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. पर्यटक इथे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी येतात.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकोरोनाचा पुन्हा उद्रेक वाढतोय; राज्यात 1956 सक्रिय रुग्णांची नोंद तर दोन जणांचा मृत्यू !
Next Article पाथर्डी| चिंचपूर पांगुळ- मानेवाडी अखंड हरिनाम सप्ताहास आजपासून सुरुवात
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.