सोमराज बडे,पाथर्डी ,वृत्तसेवा:
पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे,करोडी ,चिंचपूर पांगुळ,जोगेवाडी,वडगावं तसेच परिसरातील ग्रामस्थच्या मागणीवरुन कोपरंगाव आगार व्यवस्थापकांनी कोपरंगाव-शिर्डी-राहता-राहुरी- वाबोरी-पांढरी पूल-तिसगाव, पाथर्डी-चिंचपूर पांगुळ-अंमळनेर-डोगरकिन्ही अशी एसटी बससेवा सुरु केली आहे. ही बस रोज सकाळी ११.वाजता कोपरंगाव येथून सोडण्यात येणार आहे.तर डोगरकिन्ही येथे सहा वाजता पोहचणार आहे.

चिंचपूर पांगुळ ग्रामस्तांच्या वतीने यावेळी बस चे चालक बापूसाहेब गर्जे वाहक नवनाथ पवार यांचा विष्णू खाडे ,दादासाहेब बारगजे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,हार,फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी ,नवनाथ बडे,भास्कर अंबिलढगे,उद्धव केदार,विक्रम साखरे,बाबासाहेब बडे,नितीन बारगजे,नवनाथ खंडागळे,गणपत बडे,सीताराम पंडागळे, नामदेव सातपुते,बंडू बडे,पप्पू साळवे,विशाल वणवे,सोमनाथ ढगे,भगवान रंधवे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बस सेवेत कोपरंगाव-सोनई-वाभोरी,पांढरी पूल,तिसगाव,पाथर्डी-,कारेगाव,मोहटा,करोडी चिंचपूर इजदे,पिंपळगाव टप्पा,जाटवड,मानेवाडी,चिंचपूर पांगुळ,जोगेवाडी,पांढरवाडी फाटा,अंमळनेर-डोगरकिन्ही येथील शाळकरी मुले,मुली तसेच ईतर प्रवाशांना प्रवास करताना सोईचे होणार आहे. प्रवाशांना बसची संगणकीय आरक्षण सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बस सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच दत्तू खेडकर ,सोमराज बडे,यांनी केले आहे
कोपरंगाव -डोगरकिन्ही मार्गावर गेली चाळीस वर्षापासून एसटी बस सेवा सुरु होती .परंतु गेली चार वर्षांपासून हि बस काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. यासाठी एसटी कष्टकरी जनसंघाचे केंद्रीय सरचिटणीस तसेच एसटी को ऑप.बँकेचे नूतन संचालक श्री.दत्ताभाऊ खेडकर(सरपंच) तसेच पोपट दशरथ बडे,पत्रकार सोमराज बडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले.
तशा प्रकारचा वेळोवेळी पाठपुरावा विभागीय कार्यालय नगरला करण्यात आलेला होता.मा.दत्ताभाऊ खेडकर(सरपंच), डीसी.सपकाळ मॅडम नगर, डीएम बनकर साहेब कोपरगाव. आदींनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे या मार्गावरील प्रवाश्यांनी एसटी प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत. तसेच ही बस कायमस्वरुपी चालू ठेवण्याची एसटी प्रशासनास विनंती केली आहे.
