Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » गतवर्षी प्रमाणे याही वर्षी कर्जतमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार

गतवर्षी प्रमाणे याही वर्षी कर्जतमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 19, 2023Updated:February 19, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज: जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचे आ. रोहित पवार यांच्या वतीने कर्जत शहरात आयोजन; खा. शरदचंद्रजी पवार साहेब राहणार उपस्थित

कर्जत | गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन कर्जत शहरात करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित करून महाराष्ट्राची बैलगाडी शर्यतीची असलेली परंपरा जोपासण्यासाठी आणि जपण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले होते व त्याला संपूर्ण राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला होता.

गेल्या काही वर्षांपासून बैलगाडी शर्यत ही कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने त्याच्यावरती बंदी आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्तीसह बैलगाडी शर्यतीला मान्यता दिल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत शहरात बैलगाडी शर्यतीचे आयोजन मागच्या वर्षी करण्यात आले होते. त्याच्याच दुसऱ्या पर्वाचे आयोजन 21 फेब्रुवारी 2023 रोजी कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी देखील उपस्थित असणार आहेत.

ग्रामीण भागात विविध प्रकारच्या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी व कमी अंतराच्या मालवाहतुकीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडीने महत्त्वाची अशी भूमिका बजावली आहे. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत महाराष्ट्रात बैलपोळा हा सर्जा-राजाचा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी साजरा केला जातो. त्यानंतर आता राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आयोजित करून शेतकऱ्यांसाठी प्रतिष्ठेची आणि सन्मानाची समजली जाणारी अशी ही परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देखील दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील बैलगाडी शर्यत प्रेमींनी कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनेमका कोणी चोरला जामखेडचा पुढारी वड..! वडावरून राजकारण
Next Article छत्रपती शिवाजी महाराज एका समुहाचे नसून अखंड महाराष्ट्राचे दैवत- विकिभाऊ सदाफुले
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.