जामखेड येथे छत्रपती शाहु महाराज युवा शक्ति करियर शिबीर संपन्न; शिबीरास विद्यार्थांचा मोठा प्रतिसाद
दि. 02 जून 2023 रोजी कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात जामखेड येथील जगदंबा मंगल कार्यालयात हे करिअर शिबिर संपन्न झाले कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री माननीय मंगल प्रभात लोढा साहेब यांच्या संकल्पनेतून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड यांनी जामखेड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी उद्घाटक म्हणून मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आमदार श्री. रोहित पवार हे उपस्थित होते.

मात्र पुन्हा एकदा आमदार राम शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलले का? का ते स्वतः च या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत , खासदार सुजय विखे व रोहित पवार एकाच मंचावर आल्याने व तसेच माघील काही दिवसांपूर्वी राम शिंदे यांनी विखे पिता- पुत्रावर केलेले आरोप या सर्व घडामोडींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे, या मंग हा योगायोग की, खरोखरच सुडाचे राजकारण केले जात आहे, अशी चर्चा आहे.

हा मुद्दा ठरला चर्चेचा
खासदार डाँ.सुजय विखे म्हणाले 300 मुलांच्या मध्ये बरेच तहसीलदा प्रांताधिकारी तयार होतील आपली पण कामे होतील ,रोहित पवार म्हणाले तहसीलदार, प्रांताधिकारी होतील आपले कामे करतील पण त्यांना कोणी निलंबित करत असेल तर आपण त्यांना विरोध केला पाहिजे.
पहाव्हिडिओ
#रोहितपवार #jamkhed pic.twitter.com/Gll2Zeycme
— Mahalokwani (@mahalokwani) June 3, 2023
या शिबिरामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत तालुक्यात जिल्ह्यात व उद्योजकता विभागात रोजगार आणि स्वयंरोजगारक्षम अभ्यासक्रम कुठले आहेत आणि त्या अभ्यासक्रमांना प्रवेश कसा घेता येईल या विभागामार्फत करिअर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते या करिअर प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांची माहिती दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली .
यावेळी बोलताना खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बोलताना सांगितले की दहावी आणि बारावी नंतर काय? हा सर्वांनाच पडणारा प्रश्न असून आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून आपल्या सुविधा आणि आपली सोय पाहून पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्या, अन्यथा मित्रांनी घेतले म्हणून कुठेही प्रवेश घेवून पैसा आणि वेळ वाया घालू नका. सध्या स्पर्धेचे युग असून आपण आपले सर्वोत्तम कशात देवू शकतो त्यातच करियर करा असा सल्ला देवून येत्या १५ जुन रोजी एक मोठी स्पर्धा परीक्षा घेणार असून यातून ३०० युवक युवती यांची MPSC व UPSC च्या मुख्य प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. यात जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे या प्रसंगी त्यांनी आवाहन केले.
या प्रसंगी बोलताना आमदार श्री.रोहित पवार म्हणाले की राजकारणात सध्या अत्यंत वाईट दिवस असून उच्चशिक्षित तरुणांचे हे क्षेत्र नाही इथे अशिक्षित नेते तुम्हालाच चार गोष्टी सूनावतात त्यामुळे या दलदलित येवू नका असे आवर्जून सांगितले. योगायोगाने जरी विविध पक्षाचे नेते एकमेकांना भेटले तरी त्याच्या पत्रकार आपल्या सोयीने बातम्या करतात ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. गरीब विद्यार्थ्यांसाठी समविचारी लोकप्रतनिधींच्या सहकार्यातून कशा पद्धतीने शिक्षण देता येईल या करिता आपण प्रयत्नशील राहू असे
विद्यार्थ्यांनी आपल्याला भविष्यात कोणता कोर्स करायचा आहे हे 10 वी 12 वी नंतर ठरवायचे असते पुढचं शिक्षण घेऊन आयुष्यात आपण काय करणार आहात याचा विचार आत्ताच करण्याची गरज आहे अभ्यासक्रमात आपण चुकीची दिशा निवडली तर तो अभ्यासक्रम मध्ये सोडून द्यावा लागतो त्यामुळे आपल्यासह आपल्या आई-वडिलांनाही त्याचा खूप मोठा त्रास होतो त्यामुळे करिअर मार्गदर्शन घेणं आणि अशा शिबिरांना उपस्थित राहणं हे फार महत्त्वाचे असते तालुक्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने हे शिबिर घेतलं त्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचे आमदार रोहित पवार यांनी मनापासून अभिनंदन केले आहे.
खासदार सुजय विखे आणि आमदार रोहित पवार हे एकाच मंचावर आल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रोहित पवार म्हणाले की शैक्षणिक क्षेत्र आरोग्य क्षेत्र व इतर कोणतेही सामाजिक क्षेत्रामध्ये कोणीही राजकारण आणू नये असं आम्हाला शिकवलेलं आहे तसं शिकवलं नसतं तर कदाचित आम्ही एका व्यासपीठावर आलो नसतो युवकांच्या पुढच्या भविष्याचा विषय असल्यामुळे राजकारण बाजूला ठेवून एका व्यासपीठावर येणं म्हणजेच राजकीय विचार एकत्र येणं नाही त्याला समाजकारण म्हणतात कदाचित अनेक लोक याचा वेगळा अर्थ काढतील परंतु युवकांच्या बाबतीत कोणीही राजकारण केलं नाही पाहिजे ही आम्हाला लहानपणीपासून मिळालेली शिकवण आहे असं आमदार रोहित पवार म्हणाले.
याप्रसंगी कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्जत प्राचार्य विकास थोटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड प्राचार्य अजय वाघ तज्ञ मार्गदर्शक डॉ रेश्मा चेडे प्राचार्य विकी घायतडक ज्ञानेश्वर अनावडे, दत्तात्रय वारे, रमेश आजबे बंकटराव बारवकर,रविंद्र कडलग, प्रविण उगले,शिवाजी काळदाते अमोल गिरमे आदी विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते
यावेळी तज्ञ मार्गदर्शक यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कर्जत व जामखेडच्या कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे आभार अजय वाघ यांनी मानले.
