Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; अहमदनगरमध्ये मान्सूनचं जोरात आगमन, पंजाबराव डख यांचा अंदाज पुन्हा योग्य ठरला !

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; अहमदनगरमध्ये मान्सूनचं जोरात आगमन, पंजाबराव डख यांचा अंदाज पुन्हा योग्य ठरला !

mahalokwaniBy mahalokwaniJune 4, 2023Updated:June 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर (प्रतिनिधी ): राज्यात सध्या शेतीपूर्व कामांनी वेग पकडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात देखील बदल होत आहे. मान्सून आगमनाची चाहूल असताना आता अहमदनगरमध्ये मान्सूनचे विजांच्या कडकडाटासह जोरात आगमन झाले. तसेच राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस होत आहे.

यामुळे वातावरणात गारवा पाहायला मिळत असून कमाल तापमानात देखील घट झाली आहे. अशातच हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मान्सून संदर्भात एक मोठे भाकीत वर्तवले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की यापूर्वी पंजाबराव डख यांनी आठ जूनला मान्सूनच राज्यात आणि चार जून अहमदनगर, बीड आणि सोलापूरमध्ये आगमन होणार असं सांगितलं होतं.

मात्र आता मान्सून आगमनासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने मान्सूनचे जवळपास तीन दिवस लवकरच आगमन होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले होते. एका शेतकरी मेळाव्यात बोलताना पंजाबराव डख यांनी या संदर्भात माहिती दिली होती.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये मानसून चार जूनलाच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यानंतर 8 जून पासून मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढणार असून 22 जून पर्यंत राज्यात सर्व दूर मान्सूनचा पाऊस पोहचणार आहे.

विशेष बाब म्हणजे जून महिन्यात खरीप हंगामातील पेरण्या देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून महिन्यात मान्सूनचा चांगला समाधानकारक पाऊस पडणार आहे. जून महिन्यात पेरणी योग्य पाऊस पडण्याची शक्यता असल्याने निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा हवामान अंदाज दिलासादायक सिद्ध होणार आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जून महिन्यात पेरण्या होणार नाहीत त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलै महिन्यात कोणत्याही परिस्थितीत होतील असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. यासोबतच डख यांनी यंदा गेल्या वर्षी प्रमाणेच म्हणजे 2022 प्रमाणे चांगला समाधानकारक मानसून राहणार असल्याचे सांगितले होते.

यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात देखील चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाळी काळात चांगला पाऊस होणार असल्याने साहजिकच शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात यंदा चांगली वाढ होण्याची शक्यता असून यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात देखील भरीव वाढ होईल, असा आशावाद आता व्यक्त केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमधील कार्यक्रमाला राम शिंदेंची गैरहजेरी; सुजय विखेसह चक्क रोहित पवारांनी लावली हजेरी.!
Next Article मयत अक्षय भालेराव यांच्या खून्यास जन्मठेप झाली पाहिजे- ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव
mahalokwani
  • Website

Ladki Bahin Yojana 2026 | लाडक्या बहिणींना दिलासा! खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 4500 नाही तर ‘इतके’ रुपये आले, लगेच बॅलन्स करा चेक

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.