जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग बनला; मृत्युचा सापळा –
जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार
जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्गाचे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने २० ते २५ लोकांचे अपघात होताना दिसत आहे, दि.२६ जुलै रोजी रात्री एका रुग्णाला जबर मार लागला असून सकाळी ११.०० वाजता पिक अप व व्हिस्टा गाडीची धडक झाली असून ड्रायव्हर जखमी झाला आहे, पंचायत समिती चे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी शासकीय दूध डेअरी,बीड रोड येथे झालेल्या अपघात ग्रस्ताला मदत करून, माणूसकीचा परिचय करून दिला आहे.

साकत या आपल्या गावाहून जामखेड येथे येत असताना भरपावसात माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी सकाळी ११.०० च्या सुमारास वाटेत अपघात झाल्याचं आढळलं. या अपघातात हे गंभीर जखमी अवस्थेत होते. मुरुमकर यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना तत्काळ मदतीचा हात दिला. या अपघातात यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.

पावसाचे दिवस असल्यामुळे या रोडवर चिखल होत असून दर पाच मिनिटाला येथे ऍक्सीडेन्ट होत आहे , दिवसभरात २०- २५ लोक या चिखलामुळे पडतात काहींना तर गंभीर इजा होत आहेत, मात्र ठेकेदार सुस्त आहे
Jamkhed | शिक्षण विभागाचा पुन्हा दणका! जामखेड महाविद्यालयासाठी घेतला हा सर्वात मोठा निर्णय..

यावेळी बोलताना माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर म्हणाले कि, या हायवे रोडचे काम चालू आहे , हे खूप संथ गतीने चालू आहे , या कामात जो मुरूम वापरला जात आहे तो माती मिश्रित आहे , त्यामुळे या रोडवर रोज अपघात होत आहेत , काहीना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे , तरी या कामावर शासनाने लक्ष दयावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर यांनी दिला आहे .
