जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक मा.अमित चिंतामणी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील साकत येथील शिवप्रतिष्ठान संचलित साकेश्वर गोशाळा येथे गायींना हिरवा चारा वाटप करण्यात आला

यावेळी शिवप्रतिष्ठाणचे तालुका प्रमुख पांडूरंग भोसले म्हणाले, प्रत्येक धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे नगरसेवक अमित चिंतामणी यांचे कार्य अनमोल आहे.
मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे म्हणाले की, नगरसेवक अमित चिंतामणी यांचे कार्य शहरात व शहरातील २१ प्रभागातील नागरिकांनी पाहिले आहे.तसेच त्यांनी जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामे करुन जनतेची सेवा केली आहे.
देशी गोवंश आहे त्याचे संवर्धन करावे अशी भावना नगरसेवक अमित चिंतामणी यांनी ठेवून आज रोजी वाढदिवसा निमित्त गायींना हिरवा चारा देण्यात आला,हे कौतुकास्पद आहे.
तसेच जामखेड तालुक्यातील मोहा फाटा येथील निवारा बालगृह येथे अनाथ,निराधार,पिडीत,वंचित घटकांच्या मुलांमध्ये आपला वाढदिवस नगरसेवक अमित चिंतामणी मित्र परिवार यांच्या वतीने साजरा करण्यात आला.निवारा बालगृहातील मुलांसाठी किराणा साहित्य देण्यात आले.
या प्रसंगी शिवप्रतिष्ठाणचे तालुका प्रमुख मा.पांडुराजे भोसले, मनसे तालुका अध्यक्ष मा.प्रदीप टापरे, अँड.प्रविण सानप, केदारशेठ रसाळ ,अनिल बेद्रे, भाऊ परदेशी,सचिन मासाळ, उमाकांत कुलकर्णी,गणेश काळे,ईश्वर साळुंके , सुमित खांडविकर,विठ्ठल परांडकर,प्रशांत राऊत,राजु गवळी, संतोष जगताप, गणेश वेदपाठक , दादा कुलथे आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते

