जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहर भिमजयंती उत्सव समिति च्या अध्यक्ष पदी राजन समिंदर सर, व खजिनदार पदी नाना मेघडंबर यांची निवड झाल्याबद्दल आज रोजी जामखेड तालुका कर्मचारी कृती समिति च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी जेष्ठ शिक्षक दशरथ कोपनर सर म्हणाले ,आपला एक सहकारी मित्र भिमजयंती उत्सव समिति च्या अध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड होते ही अभिमानाची बाब आहे.
आपल्यातील एक सहकारी तालुक्यात सामाजिक कार्याची धुरा सांभाळणार आहे सार्थ अभिमान वाटतो.आंबेडकर जयंती एक दिशादर्शक व आदर्श जयंती पार पाडतील असा विश्वास यावेळी गोकुळ गायकवाड सर यांनी व्यक्त केला.
भिम जयंती उत्सव हा वर्षानुवर्ष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा.असे यावेळी जिल्हा शिक्षक बँकेचे विश्वस्त मुकूंदराज सातपुते सर म्हणाले.
विजय जाधव सर म्हणाले की,आमच्यातील एक सहकारी मित्र जे सामाजिक चळवळीत नेहमीच अग्रेसर असतात.तसेच त्यांनी तालुक्यासह जिल्ह्याला भिमजयंती उत्सवाच्या माध्यमातून आदर्श घालून द्यावा.
पुढील काळात ही भिम जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी असा विश्वास अहमदनगर जिल्हा परिषद सेवक सहकारी क्रेडिट सोसायटी, च्या संचालिका ज्योतीताई पवार यांनी व्यक्त केला.व राजन समिंदर सर यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
भिम जयंती उत्सव समस्त भारतीयांचा उत्सव असून सर्व समाजाने एकत्रित राहून एक दिलाने उत्सवामध्ये सहभागी होवून जबाबदारी पार पाडूया असे यावेळी मुलांची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभाताई कांबळे म्हणाल्या.
यावेळी बोलताना मा.विकी (भाऊ) सदाफुले सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की, जामखेड तालुका कर्मचारी कृती समिति चे अध्यक्ष युवराज पाटील हे शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी यांचे जूनी पेन्शन साठी सरकार दरबारी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत व त्यांचे सामाजिक कार्य व मानवहित भावना खरोखरच अभिमानास्पद आहे. स्वतः ची नोकरी पाहून ते आजच्या धावपळीच्या युगात ते सर्वांसाठी आपला अनमोल वेळ देवून सामाजिक कार्यप्रणाली जपली आहे . तसेच भिम जयंती उत्सव समिति चे पदाधिकारी यांच्या निवडी झाल्याबद्दल जामखेड तालुका कर्मचारी कृती समिति च्या वतीने सत्कार करण्यात आला.सर्व कृती समितीचे पदाधिकारी व सदस्यांचे मनापासून आभारी.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, विस्तार अधिकारी सिध्दनाथ भजनावळे,कृती समिति चे अध्यक्ष युवराज (दादा) पाटील, सचिव ज्ञानेश्वर कोळेकर, जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत,विश्वस्त मुकूंदराज सातपुते,जेष्ठ शिक्षक दशरथ कोपनर सर ,विजयराज जाधव, प्रविण गायकवाड सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, गोकुळ गायकवाड, अहमदनगर जिल्हा परिषद सेवक सहकारी क्रेडिट सोसायटी, च्या संचालिका
ज्योतीताई पवार,मुलांची शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभाताई कांबळे, संभाजी ढोले,अमोल हजारे,सनी (प्रिन्स)सदाफुले,भिम जयंती उत्सव समिति चे उपाध्यक्ष रवि सोनवणे,दादा घायतडक, विनोद घायतडक,मिलींद भोसले,किशोर कांबळे,विकी गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
