जामखेड प्रतिनिधी धनराज पवार
दिनांक 14/03/ 2023 रोजी जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती दिलीप गुगळे यांचा वाढदिवस श्री ब्रह्मनाथ सेवा प्रसार शिक्षण मंडळ सेलू संचलित जामखेड येथील निवासी मूकबधीर विद्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला.

निवासी मुक बधिर विद्यालयात येथे वाढदिवसा निमित्त किराणा साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केले, आपला वाढदिवस निवासी मुक बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये साजरा करून मुलांना एक आगळावेगळा आनंद देण्याचा सामाजिक उपक्रम दिलीप गुगळे यांच्या माध्यमातून घेण्यात आला.
अनाथ निराधार,मुक – बधिर या लोकांची सेवा करणे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे.मुक बधीर विद्यालयातील मुलांना खूप चांगल्या प्रकारे येथील शिक्षक सांभाळत आहेत. त्यांचे राहणीमान , स्वच्छता पाहून समाधान वाटते.यावेळी अशोक सांगळे,सोमनाथ डोके , राजुभाई सय्यद, गणेश अडाले , विद्यालयातील गर्जे सर ,दहिफळे सर, गणेश आडसूळ, गुफरान कुरेशी, आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
