महालोकवाणी न्यूज:
जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरातील लक्ष्मीआई चौक (संविधान स्तंभ) येथे शिवजन्मोत्सव सोहळा माहिला समिती आयोजित शिवजयंती निमित्त मा.संजय (काका) काशिद मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आज दि.9 मार्च रोजी सकाळी १० वा. प्रसिद्ध उद्योगपती रमेशशेठ गुगळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले तसेच भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. आजच्या रक्तदान साठी राजेंद्र जाधव (फिटर) व सौ.कूंदा राजेंद्र जाधव या दांम्प्त्याने सर्व प्रथम रक्तदानाला सुरवात केली.

यावेळी कार्यक्रमा चे उद्घाटक प्रसिद्ध उद्योगपती रमेश गुगळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ति व बुध्दी च्या जोरावर स्वराज्य उभे केले आहे तसेच शक्ति व बुध्दी बरोबरच त्यांच्या मनामध्ये “स्वराज्याची’ आस लागली होती,ज्यावेळेस आस निर्माण होते. त्यावेळेस तुमच्या हातून भव्य – दिव्य कार्य होते. आपल्याला सर्वांची साथ मिळते .अशा प्रकारे निस्वार्थ भावनेतून आपण जे काम करत असतो,त्यावेळेस यश नक्की मिळते. याचीच प्रेरणा घेत संजय काशिद हे समाजपयोगी असे रक्तदान शिबीर भरवतात. हे आजच्या काळाची गरज आहे. सध्या सर्वत्र रक्ताचा तुटवडा असून रक्तदान शिबिराच्या माध्यमा तुन जनजागृती होत आहे.रक्त मिळाल्या ने एखाद्या चे प्राण वाचू शकतात .व प्राण वाचवण्याचे भव्य- दिव्य कार्य संजय काशिद हे करत आहेत.
याप्रसंगी तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर,भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक बिभिषण धनवडे, . डाँ.शशांक शिंदे,डाँ.अविनाश पवार, कँप्टन लक्ष्मण भोरे,शहरप्रमुख गणेश काळे,सौ.रोहिणी संजय काशिद,दिपक टेकाळे , जुबेर पठाण , विशाल अब्दुले, मयुर भोसले सर,संजय बेलेकर, किरण मुळे, नाना रासकर,बाळासाहेब आरेकर ,भारत मोरे, सुरज काळे, अवि बेलेकर, चंदन अंधारे, किरण ओझर्डे, शंकर बोराटे, आण्णा काशिद, संतोष शिंदे, कैलास खेत्रे, सागर गुंदेचा , अंगद चव्हाण, विजय काशिद, विशाल लोळगे, दिपक सुरसे आदी पदाधिकारी,कायकर्ते व नागरिक मोठया संख्येनेउपस्थित होते.
या रक्तदान शिबीरासाठी सुरभी ब्लड सेंटर (विकास जरे) यांचे विशेष सहकार्य लाभले असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष मोहळकर यांनी केले.
