जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने अतिक्रमण धारकांनी सदरचे अतिक्रमण ७ दिवसात (दि.७ मार्च २०२३ पर्यंत) काढून घ्यावीत असा विनंतीवजा आदेश दिल्यानंतर ८ मार्च रोजी त्याची मुदत संपल्याने जामखेड कर्जत रोडवरील पंचदेवालय (कोठारी पंप) येथून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली .
हे वाचले का- BREAKING NEWS : डीएड बंद होणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, त्याऐवजी हा पर्याय ?
गोर गरीब टपरीधारक व छोटे मोठे व्यवसायिक यांनी आपले अतिक्रमण कडून घेतले पण धनदांडगे अतिक्रमण धारक यांनी अजूनही त्यासाठी अनुकूलता दाखवली नाही
यावेळी शिवसेना शहराध्यक्ष देविदास भादलकर बोलताना म्हणाले,मूठभर व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे कामात अडथळा येतोय हे चुकीचं आहे , गोरगरीब हातावर पोट असणाऱ्या टपरी धारकांनी एका नोटीस वर आपलं अतिक्रमण काढलं आणि हे धनदांडगे अतिक्रमण करून देखील काढायला विरोध करत आहेत म्हणजे किती हा मुजोरपणा , यांच्या विरोधात सर्व जामखेड वासीयांनी एकत्र यायला पाहिजे ,या आशा वृत्तीचे लोकांमुळे विकास थांबला नाही पाहिजे जर उर्वरित अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ झाली तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडू .
