महालोकवाणी न्यूज:
जामखेड प्रतिनिधी : धनराज पवार
जामखेड- सौताडा राष्ट्रीय महामार्ग ५४८डी च्या कामांचा शुभारंभ आज रोजी खर्डा चौक येथे पार पाडला. यावेळी अहमदनगर दक्षिणचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री आ.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना विखे म्हणाले की,केंद्रात व राज्यात डबल इंजिन सरकार आहेत तसेच कर्जत जामखेड मतदारसंघात देखील डबल इंजिन सरकार आहे.. मतदारसघांतील प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे.तसेच मतदरसंघांतील सर्व घटकांना न्याय देऊ असा विश्वास डॉ सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री प्रा. आमदार राम शिंदे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार किती फायद्याचे आहे. पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी यांना विराजमान करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष अजय काशिद,शिवसेना तालुका प्रमुख प्रा.कैलास माने सर,माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, गौत्तम उत्तेकर,रविंद्र सुरवसे, सोमनाथ पाचरणे, उद्योगपती राजुशेठ देशपांडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, उपाध्यक्ष मोहन मामा गडदे ,शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, नगरसेवक अमित चिंतामणी,प्रविणशेठ चोरडिया,पोपट राळेभात,मनोज कुलकर्णी,डॉ. ज्ञानेश्वर झेंडे,माजी उपसभापती अंकुशराव ढवळे, बापुराव ढवळे,ॲड प्रविण सानप,सोमनाथ राळेभात,करण ढवळे, वैजीनाथ पाटील, बाजीराव गोपाळघरे,सरपंच अंकुश शिंदे, पांडुरंग उबाळे,लहू शिंदे,उध्दव हुलगुंडे, मोहन देवकाते,अर्जुन म्हेत्रे,शिवकुमार डोंगरे यांच्या सह सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
