महालोकवाणी न्यूज
पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे:-
दौंड. ता. 29 जाने 2023
लोणारवाडी तालुका दौंड येथे विविध विकास कामांच्या प्रसंगी ते बोलत होते.. ते पुढे म्हणाले की मुंजाबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या इमारती सह ऐकुण 35 लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटनआमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते पार पडले. तालुक्यात जल जिवन योजनेची . कोट्यावधी रूपयांचे कामे चालू आहेत तसेच तालुक्यातील सर्व जल जिवन योजनेला भीमा नदीचे दूषित पाणी पिण्यायोग्य नसल्याने ते वापरता येणार नाही म्हणून कॅनॉलच्या पाण्याचा वापर करण्याचा आमचा माणस आहे. तसेच .तालुक्यात विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे.
SBI mudra loan| स्टेट बॅंकेकडून मिळणार 10 लाखापर्यंत कर्ज
तसेच यापुढे लोणारवाडी गावाला कसलाही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जाहीर सभेत बोलताना आमदार राहुल कुल यांनी दिली या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। वासुदेव नाना काळे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्यामुळे त्यांचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला .

वासुदेव नाना म्हणाले की जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाल्याने लोणारवाडी गावाला जास्तीचा निधी देण्याचा माझा प्रयत्न राहील .विकास सोसायटीचे चेअरमन आणि माजी सरपंच गोरख गाढवे म्हणाले की दोन्ही नेत्यांनी माझ्या गावाला भरपूर निधी द्यावा .मला दोन्ही नेते पित्यृत्तुल्य समान आहेत.या कार्यक्रमासाठी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संपत आटोळे. किरण काळे .श्रीकांत गुंड वकील. सरपंच प्रतीक्षा हिवरकर .उपसरपंच जयश्री गाढवे पोलीस पाटील शारदा वाघ . जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय काळभोर. अंबादास गाढवे . युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख किरण वाळुंजकर.अझर शेख.मुकेश गुणवरे. इत्यादी.उपस्थित होते प्रास्ताविक गोरख गाढवे यांनी तर सूत्रसंचालन महेश धकाटे यांनी तर आभार विजय वाघ सर यांनी केले
