पुणे जिल्हा प्रतिनिधीः बबनराव धायतोंडे
हि योजना अनुसूचित जातीचे लाभार्थी शेतकरी ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु दिड लाखाच्या मर्यादेत आहे अशा शेतकरी यांना नवीन विहीर , जुन्या खाजगी विहिरी ची दुरुस्ती , पंपसंच , शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण , विजजोड तसेच सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचे लाभासाठी राज्य शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 पासून प्रक्रिया ही संगणकीकृत केली असून लॉटरी पध्दतीने लाभार्थी यांची निवड केली जाते.

पंचायत समिती दौंड अंतर्गत भूजल सर्वेक्षण विभागाचे सुरक्षित अशी वर्गवारी असलेल्या 45 गावांमध्ये नवीन विहिरी मंजूर केल्या जातात या योजेनेमधील निवडी साठी नवीन विहीर या बाबीसाठी किमान 0.40 हे आर. क्षेत्राची मर्यादा असून जास्तीत जास्त 6 हे क्षेत्राची मर्यादा आहे .
तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थी करीता वरील नियम अटींवर लाभासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते.
पंचायत समिती दौंड द्वारा तालुक्यातील शेतकरी यांना दौंड पंचायत समिती चे कृषी अधिकारी श्री दिनेश अडसूळ साहेब यांचे मार्फत आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा , अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी गुगल प्ले स्टोर वर महा डी बि टी अप्लिकेशन उपलब्ध आहे .
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51A62CEFB7856E29C24
