पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे
अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे राज्य कोअर कमिटीचे सदस्य व पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. श्री. नानासाहेब टेंगले, यांच्या नेतृत्वाखाली दौड शहर पदाधिकारी यांनी दौड शहरात नागरिकांना शौचालय नाहीत म्हणून होणारी गैरसोय आणि कचऱ्याचे साचणारे ढिगारे या प्रश्नासाठी तहसीलदार आणि नगरपरिषदेतील अधिकारी यांना धारेवर धरले .

तहसीलदार पाटील साहेब आणि नगराध्यक्ष पदाधिकारी यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी शहराध्यक्ष रवी बंड, महिला अध्यक्ष सौ. प्रतिभा डेंगळे, उपाध्यक्ष मयूर उदावन्त, योगिता जाधव ,कार्याध्यक्ष राहुल मदने, दुर्गा सुरवसे, सचिव नीना जोसेफ, प्रसिद्ध प्रमुख आकाश अंकुश, सोनल कसुरे, संघटक श्वेता रायकर , दीपाली सोनवणे, मीनल निंबोळे, सुरेखा बगाडे, अंजली कांबळे इ. पदाधिकारी उपस्थित होते. जर लवकर हा विषय मार्गी नाही लागला तर संघाच्या वतीने दौड शहर बंद ची हाक दिली जाणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष यांनी दिली….
