Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » नगरमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी; गुन्हेगार मोकाट मात्र सर्वसामान्यांनाच पोलिसांचा त्रास.!

नगरमध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी; गुन्हेगार मोकाट मात्र सर्वसामान्यांनाच पोलिसांचा त्रास.!

mahalokwaniBy mahalokwaniJuly 18, 2023Updated:July 18, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

नगरमध्ये गुन्हेगार मोकाट मात्र सर्वसामान्यांनाच पोलिसांचा त्रास

अहमदनगर : नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोडला झालेल्या मर्डरची घटना ताजी असतानाच आता सावेडीमधील एकविरा चौकात दुसरा मर्डर झालाय. मात्र नगर पोलीस गुन्हेगारांना सोडून सर्वसामान्यांना त्रास देताना दिसत आहेत. शहरातील सिग्नल वरती पोलीस प्रशासन सर्वसामान्य लोकांना विचारपूस करण्याच्या नावाखाली त्रास देऊन दंड घेतायेत.

एकीकडे राज्यातील नेते विधानसभेत सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत असताना नगरमध्ये पोलीस प्रशासनाच्या या दादागिरीला सर्वसामान्य लोक बळी पडताना दिसत आहेत. मागील सहा ते सात महिन्यांमध्ये सातत्याने नगर शहरात तसेच जिल्ह्यात खून, दरोडे, चेन स्नॅचिंग असे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहेत. प्रशासनाच्या कृपा आशीर्वादानेच मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय जिल्हा भर सरार्सपणे सुरू आहेत. तसेच अनेक ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मुलींच्या छेड काढणे, अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणे, या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच सामान्य जनतेचे गुन्हे घेण्यास विलंब करणे, घेतलेल्या गुन्ह्यांचा तपास वेगाने न करणे, विशेष म्हणजे पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात जिल्हा पोलीस प्रशासन हे अपयशी ठरत आहे.

Rain update: पुढील चार, पाच दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होणार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

➤ नगर पोलीस अधीक्षक यांच्या बदलीची मागणी

जिल्हा भरातील गुंडांना पोलीस अधीक्षक यांचा धाक न राहिल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावत असून परिणामी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण आहे. जिल्हयात महिला व शालेय विद्यार्थिनी असुरक्षित असून. या सर्व बाबींचा आणि मागील पाच ते सहा महिन्यांत घडलेल्या घटनांचा विचार करून सर्व सामान्य जनतेच्या मनात पोलीस प्रशासना विषयी आदर आणि गुंडांना खाकीचा धाक निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची तत्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले.

Table of Contents

    ➤ प्रशासन करतंय तरी काय ?

    गेल्या काही वर्षांपासून नगर शहरात अवैध गुटखा विक्री , क्रिकेट बॅटिंग , जुगाराचे अड्डे , अवैध दारू विक्री, दूध भेसळ , बेकायदा प्लॉट ताबे अशा अनेक अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. सदर धंदे करत असलेल्या व्यक्ती एकतर राजकीय पक्षांशी संबंधित आहेत आणि संबंधित नसतील तर त्यांच्या आशीर्वादाने काम करत आहेत. अवैध पद्धतीने मिळवलेला पैसा आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी हीच शहराची मुख्य अडचण बनली आहे.

    ➤ ताबा गॅंगचा सुळसुळाट

    बेकायदा पद्धतीने प्लॉटचा ताबा मारणे आणि विशिष्ट समाजाच्या नागरिकांना प्लॉटमध्ये घुसून प्लॉटमालकाकडून खंडणी मागणे हा देखील गुन्हेगारीचा नवीन पॅटर्न नगर शहरात सुरू आहे. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये महापालिकेच्याच काही कर्मचाऱ्यांकडून टीप दिल्यानंतर हे प्रकार केले जात असल्याचे आरोप याआधी करण्यात आलेले आहेत. मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय हे सर्व शक्य नाही त्यामुळे या अशा प्रकरणांनी जमवलेला पैसा हा अखेर कुठे जातो ? याचा देखील तपास करणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलीस दलातील सक्षम अधिकाऱ्यांनी यासाठी धडाडीने काम करण्याची गरज आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleजामखेड येथे डंपर व दुचाकी अपघातात युवकाचा जागीच मृत्यू.
    Next Article जामखेड बीड रोड कॉर्नर ते पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता नित्कृष्ठ दर्जाचा – सरफराज पठाण
    mahalokwani
    • Website

    वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

    Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

    राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

    Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

    mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

    Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

    शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

    jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

    jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.