रामदेव बाबा सोशल मीडियावर कायम कोणत्या नाकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. रामदेव बाबा म्हणाले होते, महिला साडी नेसल्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी त्या चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. आता पुन्हा एकदा रामदेव बाबा यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
अजितदादांच्या ‘त्या ’ वक्तव्याने नाना पटोले आक्रमक..!
‘जन्नत म्हणजे मिशा कापा, टोपी घाला’
बाबा रामदेव म्हणाले, मुस्लिमांनी फक्त नमाज अदा करणे आवश्यक आहे. नमाज अदा केल्यानंतर काहीही करा, सर्व काही माफ आहे. त्यांच्यासाठी जन्नत म्हणजे घोट्याच्या वर पायजमा घालणे, मिशा कापणे, टोपी घालणे. ते म्हणाले, हे मी म्हणत नाही, पण ते हेच करत आहेत. असा स्वर्ग नरकाहून वाईट आहे. हा वेडेपणा आहे.
‘चर्चमध्ये मेणबत्ती लावून पाप धुतले जातात’
यानंतर बाबा रामदेव यांनीही ख्रिश्चन धर्मावर भाष्य केले. ते म्हणाले, दिवसा चर्चमध्ये मेणबत्ती लावल्याने सर्व पापे धुतली जातात. हिंदू धर्मात असे केले जात नाही. ते म्हणाले, मी कोणावरही टीका करत नाही, पण हे लोक असेच आहेत. काही जण संपूर्ण जगाला इस्लाममध्ये धर्मांतरित करत आहेत तर काहींना ते ख्रिश्चनमध्ये धर्मांतर करत आहेत.
उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने दिले आदेश !
‘सनातन धर्म सर्वांपेक्षा वेगळा, सेवेचा मार्ग’
बाबा रामदेव म्हणाले, सनातन धर्म हा इतर धर्मांसारखा नाही. ब्रह्म मुहूर्तावर उठणे, भगवंताचे स्मरण करणे, योगासने, ध्यान आणि सेवा करणे हा सनातन धर्म आहे. तुमच्या धर्मासाठी जागृत राहा आणि धर्मगुरूंची हाक ऐका.
रामदेव बाबा म्हणाले, इस्लाम म्हणजे नमाज अदा करणे आणि, जिहादी बनणे, हिंदू मुलींना उचलून नेणे, नमाज अदा केल्यानंतर हे सर्व शक्य आहे. असं वादग्रस्त विधान त्यांनी इस्लाम धर्माबाबत केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ख्रिश्चन धर्माबाबत देखील वादग्रस्त विधान केलं आहे. ते राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पन्नोनियो मधील ताला गावात एका धार्मिक सभेत बोलत होते.आता त्यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
