नगर- दर सालाबाद प्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत करतांना सामाजिक बांधिलकी जोपासत केवळ प्रभागापुरते जनसेवा न करता तमाम भाविक-भक्त यांना अल्पदरात शेगाव येथील गजानन महाराज दर्शनाचा लाभ देणार आहे, अशी माहिती वसंत टेकडी येथील साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी दिली.
याबाबत अधिक महिती देतांना श्री.त्र्यंबके म्हणाले की, गेल्या 9 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक तसेच भाविकांना देव-दर्शनचा लाभ मिळावा, या उद्देशाने अल्पदरात साई-यात्राचे आयोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. ही यात्रा केवळ प्रभागापुरती मर्यादित न ठेवता शहर व परिसरातील लोकांना त्यामध्ये सामावून घेतो, त्यामुळे दरवर्षी गर्दी वाढतच राहते.

यावर्षी शनिवार दि.7 जानेवारी 2023 रोजी रात्री 7 वा. संदेशनगर येथून साई मंदिरापासून बसेस निघणार आहेत. रविवारी पहाटे शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन, लोणार सरोवर, श्रीक्षेत्र नागझरी अशा धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील विविध धार्मिक तिर्थक्षेत्र या ठिकाणी ही साई-यात्रा जात असते.
यावर्षी गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येणार असून, बुकींगला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तरी राहिलेल्या भाविकांनी 4 जानेवारी 2023 अखेर योगेश पिंपळे (मो.9370790712), आकाश त्र्यंबके (8888202953) यांचेशी संपर्क करुन बुकींग करण्याचे आवाहन सुनिल त्र्यंबके यांनी केले.
