जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
जामखेड शहरातील जिल्हा परिषद मराठी मुले-मुलींची शाळा येथे आज रोजी सकाळी ७ वाजता दिवंगत श्रीमती रत्नमाला रामचंद्र समुद्र बाई (कदम बाई) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी वृक्षारोपण गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते करण्यात आले.

“प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे तसेच त्याचे संवर्धन करावे ” तसेच निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आप आपल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन जामखेड गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी आपल्या भाषणात केले.
बाळासाहेब धनवे यांनी जामखेड गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून जामखेड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला चकाकी आलेली पाहायला मिळत आहे, त्यांनी विविध विकास योजना राबविण्यास सुरवात केली आहे, अनेक शाळेत ते न सांगता भेटी देत आहेत , मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर ते लगेच उपाय योजना करत आहेत, मुलांना चांगल्या प्रतीचे शिक्षण कसे मिळेल हा मुख्य उद्धेश डोळ्या समोर ठेवून गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचे कामकाज आहे .
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक संतोष राऊत, विश्वस्त मुकुंद सातपुते, भामुद्रे मामा, कुमटकर सर, उपेंद्र आढाव सर,मा. मुलाणी सर, मुख्याध्यापक नवनाथ बडे सर , नितीन शिंदे सर, जोगदंड सर, पालक दत्ता पवार समस्थ शिक्षकवृंद विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.
