सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी : – अहमदनगर जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ- मानेवाडी येथे गुरुवर्य श्री संत वामनभाऊ महाराजांच्या जन्मोत्सवा निमित्ताने दि.२७ मार्च ते दि.३ एप्रिल या कालावधीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह होत आहे.

आज सकाळी ठीक १२:०० वाजता श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरून वैराग्यमुर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पादुका गडावरून उद्योजक राजेंद्र विष्णू खाडे, पोपट हरी बडे,सचिन नामदेव बडे यांचे वतीने हेलिकॉफ्टर ने आणल्या जाणार आहेत.
गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर हेलिकॉपटर ने मंडपावर पुस्पवृष्टी करण्यात येईल व त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात होणार आहे. आठ दिवस काकडा,रामकथा,हरिपाठ प्रवचन,कीर्तन,जागर,आदी कर्यक्रम होणार आहेत.

चिंचपूर पांगुळ-माणेवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय बडे पा,व ग्रामस्थ यांनी भाविक भक्तांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.(छाया-सोमराज बडे)
