Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पिआरपी व शिवसेना युतीचा शहरात जल्लोषभिम शक्ती व शिव शक्तीचा नारा देत दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांना भरविले पेढेमहायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल -जयदीपभाई कवाडे

पिआरपी व शिवसेना युतीचा शहरात जल्लोष
भिम शक्ती व शिव शक्तीचा नारा देत दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एकमेकांना भरविले पेढे
महायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल -जयदीपभाई कवाडे

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 6, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

अहमदनगर (प्रतिनिधी)- जोगेंद्र कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये महायुती झाली असता, शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन जल्लोष केला.
मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरविले. यावेळी जोरदार घोषणांनी भिम शक्ती व शिव शक्तीचा गजर करण्यात आला.


शहरात आलेले पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या जल्लोषप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहराध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, सुनील क्षेत्रे, सोमा शिंदे, संतोष मोकळ, मधुकर पावसे, संजय उनवणे, किरण जाधव, महिला जिल्हाध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, अक्षय बोरुडे, रांघा गायकवाड, अमोल जाधव, आदर्श उघडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयदीपभाई कवाडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये बहुजन समाजाला न्याय मिळाला नाही. या महायुतीतून बहुजन समाजाला न्याय व सन्मान मिळेल. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भिम शक्ती व शिव शक्तीचा नारा दिला असून, स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणाला या युतीतून एक नवी दिशा मिळाली आहे. भीमशक्ती व शिवशक्तीच्या एकत्रीकरणातून बहुजन समाजाला बळ मिळणार आहे. शहर व जिल्ह्यात दोन्ही पक्ष एकत्रितपणे कार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleAMRAVATI | पत्रकार दिनी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण !
Next Article भीमा – पाटस साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा- आमदार राहुल दादा कुल
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.