Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर उमेदवारांची नावे जाहीर..! यांना मिळाली संधी

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर उमेदवारांची नावे जाहीर..! यांना मिळाली संधी

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:-04 फेब्रुवारी 2023

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपकडून उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी तिकीट देण्याचं टाळलं आहे. तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे.

कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीवरून भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पश्चात उमेदवारी कुणाला मिळणार यावरून बरीच चर्चा रंगली होती. अखेरीस टिळक यांच्या घरी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी हेमंत रासनेंना उमेदवारी दिली आहे. टिळक यांच्या कुटुंबातून मुक्ता टिळक यांचे पती इच्छुक होते. पण, त्यांना नकार देण्यात आला आहे.

हे हि वाचा अजितदादांच्या ‘त्या ’ वक्तव्याने नाना पटोले आक्रमक..!


विशेष म्हणजे, कसबा पोटनिवडणुकीसाठी तिकीट फायनल व्हायच्या आधीच कुणाल टिळक यांची कालच प्रवक्तेपदावर नियुक्ती झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. कुणाल टिळक हे मुक्ता टिळक यांचे पूत्र आहेत. तसंच शुक्रवारी रात्री टिळक वाड्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. त्यानंतर आता उमेदवारांची नाव जाहीर झाली आहे. त्यामुळे आता टिळक वाड्यालाच फक्त प्रवक्तेपदावर समाधान मानावं लागणार आहे.

तर कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचं नाव निश्चित झालं आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने असा सामना रंगणार आहे. तर चिंचवड विधानसभा मतदासंघातून

भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी कांटे की टक्कर पाहण्यास मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनमाज पडा अन् हिंदू मुलींना…, बाबा रामदेव यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान !
Next Article इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा व तणाव मुक्त जीवन जगा- प्रा. गिरीश कुकरेजा
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.