Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » पृथ्वी शॉचे झंझावाती त्रिशतक, रणजी ट्रॉफीत ६ वर्षात जे घडले नाही ते पृथ्वीने करून दाखवले !

पृथ्वी शॉचे झंझावाती त्रिशतक, रणजी ट्रॉफीत ६ वर्षात जे घडले नाही ते पृथ्वीने करून दाखवले !

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 11, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मुंबई: पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीच्या आसामविरुद्धच्या सामन्यात आपले तांडव चालूच ठेवले. या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पृथ्वी २४० धावांच्या पुढे मैदानात उतरला आणि पुन्हा एक झंझावाती खेळी त्याने खेळली. आता त्याने त्रिशतक झळकावून आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या बनवली. त्रिशतक गाठण्यासाठी पृथ्वीने ३२६ चेंडूंचा सामना केला. आसामचा गोलंदाजांचा त्याने असा काही समाचार घेतला की त्यांना हैराण करून सोडले.

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पृथ्वी शॉ पहिल्या दिवसाच्या २४० धावांच्या पुढे खेळायला आला. पण, दुसऱ्या दिवशी त्याने पुढच्या ६० धावा इतक्या वेगाने केल्या की ३०० धावांचा पल्ला त्याने कधी गाठला हे कळले देखील नाही. आता तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. हैदराबादविरुद्ध संजय मांजरेकरची नाबाद ३७७ धावांची खेळी मागे राहिली आहे. यात आघाडीवर आहे बीबी निंबाळकर, ज्यांनी ७५ वर्षांपूर्वी सौराष्ट्रविरुद्ध नाबाद ४४३ धावांची खेळी केली होती.

आसामविरुद्ध त्रिशतक ठोकून पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये गेल्या ६ वर्षात जे घडले नाही ते करून दाखवले. या मोठ्या स्वरूपाच्या घरच्या मैदानावरील स्पर्धेत शतक झळकावणारा तो २०१७ नंतरचा पहिला फलंदाज ठरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वी शॉची खेळी जसजशी प्रगती करत आहे तसतसा त्याचा स्ट्राईक रेटही वाढत आहे. म्हणजेच तो प्रगती करत आता थेट टी-२० स्टाईलमध्ये येताना दिसत आहे.

एक कॅच पकडला अन सामना पलटला; संपूर्ण क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, वाचा नेमकं कारण काय ?

पृथ्वी शॉने आसामविरुद्ध १०७ धावांत आपले शतक पूर्ण केले. यानंतर त्याने १२८ चेंडू खेळून शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर केले. म्हणजे २३५ चेंडूत द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या ९१ चेंडूत त्रिशतक झळकावले. शॉचे त्रिशतक ३२६ चेंडूत पूर्ण झाले.

उजव्या हाताच्या या फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केवळ ३२६ चेंडूंमध्ये आपले पहिले त्रिशतक पूर्ण केले आणि त्यानंतर १०० च्या स्ट्राइक रेटने धावा करण्यासाठी गीअर्सच बदलले. २३ वर्षीय खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी ३४० धावा करण्याचा महान भारतीय फलंदाज सुनील गावसकर यांचा विक्रम मागे टाकला आणि भारताचा कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या धावसंख्येलाही मागे टाकले आहे. पुजाराने रणजी ट्रॉफीच्या २०१२-१३ च्या हंगामात सौराष्ट्रसाठी कर्नाटक विरुद्ध ३५२ धावा केल्या होत्या, तर लक्ष्मण यांनी १९९९-२००० हंगामात कर्नाटक विरुद्ध हैदराबादसाठी ३५३ धावा केल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमहसूल विभाग व वाळू माफिया यांच्या संगनमताने अंजनगाव ता. बारामती येथे वाळू उपसा सर्रास चालू..!
Next Article आता कुठूनही करता येणार मतदान, काय आहे RVM मशीन? RVM मशीन कसं काम करतं?
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.