Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » एक कॅच पकडला अन सामना पलटला; संपूर्ण क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, वाचा नेमकं कारण काय ?

एक कॅच पकडला अन सामना पलटला; संपूर्ण क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, वाचा नेमकं कारण काय ?

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 3, 2023Updated:January 4, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

मेलबर्न : बीग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात ब्रिस्बेन हीटचा खेळाडू मायकल नेसरने पकडलेल्या झेलची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. यामुळे क्रिकेटच्या नियमावरून वाद सुरू झाला आहे. मायकल नेसरने सीमेबाहेर उडी मारून चेंडू पुन्हा आत ढकलला आणि तो आत येऊन झेलला. चाहत्यांना वाटतं की हा झेल योग्य पद्धतीने घेतला गेला नाही आणि पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद दिले. यामध्ये मेलबर्न क्रिकेट क्लबचा नियम काय आहे हे आता जाणून घेऊया. मेलबर्न क्रिकेट क्लबने बनवलेल्या नियमानुसारच क्रिकेट खेळलं जातं.

ब्रिस्बेन हीटने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना जॉर्डन सिल्कने २३ चेंडूत ४१ धावा करत सिडनी सिक्सर्सला विजयाच्या जवळ पोहोचवले होते. तेव्हा मायकल नेसरने सीमारेषेवर झेल घेतला आणि जॉर्डन बाद झाला. शेवटी सिडनी सिक्सर्स १५ धावांनी पराभूत झाले.

नेसरने जॉर्डनचा झेल पकडला तेव्हा तो सीमारेषेजवळ होता. पण तोल जात असल्याने चेंडू हवेत टाकून सीमारेषेपलिकडे गेला. तिथे उडी मारून हवेत चेंडू पुन्हा उडवला आणि मैदानात येऊन झेल घेतला.

👏 Quite a few questions have emerged following this outstanding bit of fielding in the @BBL.@Gmaxi_32 provides expert commentary as to why this indeed was Out.

See here for the Law: https://t.co/A1dNCFU9vo#MCCLawspic.twitter.com/OppIx2ufa6

— Marylebone Cricket Club (@MCCOfficial) January 1, 2023

सामन्यानंतर बोलताना मायकल नेसरने म्हटलं की, मॅट रेनशॉनेसुद्धा असाच झेल घेतला होता. पण नियमाबद्दल मला स्पष्ट माहिती नव्हतं. मी योग्य झेल पकडला.
मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नियम १९.५.२ नुसार खेळाडू आणि चेंडूचा पहिला संपर्क सीमेच्या आत व्हायला हवा. नियम ३३.२.१ नुसार एक झेल तेव्हाच योग्य मानला जाईल जेव्हा कोणत्याही वेळी चेंडूच्या संपर्कातील क्षेत्ररक्षक झेल पूर्ण होण्याआधी सीमेबाहेर गेला नसेल. नियम ३३.२.२.४ मध्ये असं म्हटलं आहे की, चेंडू सीमेपलिकडे जाण्याआधी क्षेत्ररक्षक तो हवेत पकडतो. या नियमांमध्ये ३३.२.१ हा नियम पूर्ण असणं गरजेचं आहे. या नियमांतर्गतच पंचांनी जॉर्डन सिल्कला बाद दिलं.

एमसीसीची स्थापना १८८७ मध्ये झाली होती. १८१४ मध्ये लॉर्डसमध्ये याचं मुख्यालय बनवण्यात आलं. एमसीसीकडून क्रिकेटचे नियम तयार करण्यात येतात. गरजेनुसार या नियमात वेळोवेळी बदलही केले जातात.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनववर्षानिमित्त भाविकांना अल्पदरात गजानन महाराज दर्शनाचा लाभ देणार – सुनिल त्र्यंबके
Next Article रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या आंदोलनाची दखल आठ दिवसात वाकी पाणीपुरवठा सुरळीत होणार ….गटविकास अधिकारी प्रकाश पौळ
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.