Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक डॉ.सुरेश माने यांनी घेतली पत्रकार परिषद !

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक डॉ.सुरेश माने यांनी घेतली पत्रकार परिषद !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 19, 2022No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशनावर दिनांक २३ डिसेंबर रोजी नागपूरात विराट मोर्चा. महाराष्ट्र विधानसभा आगामी हिवाळी अधिवेशन संत्रानगर नागपूरात दिनांक १९ डिसेंबर २०२२ पासून सुरू होत असून दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने राज्यातील जनतेच्या ज्वलंत महत्वपूर्ण प्रश्नावर विराट मोर्चा चे आयोजन केले असून संपूर्ण राज्यभरातून जवळपास ५० हजार बी. आर. एस. पी. समर्थक नागपूरात या मोर्चासाठी धडकणार आहेत. या मोर्चाचे नियोजन म्हणजे या मोर्चासाठी एकटया नागपूर जिल्हातून दहा हजार व उर्वरित जिल्हयातून १५००० असे एकूण २५००० तर मराठवाडयातून एकूण १५००० व उर्वरित मुंबई कोकण, उत्तर महाराष्ट्र या विभागातून १५०००, असे एकूण ५० हजार समर्थकांचे व्यवस्थापन पक्षाने केलेले असून या मोर्चामध्ये पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक यांच्याशिवाय शिंदे फडणविस सरकारच्या चुकीमुळे उध्वस्त होणारे महाराष्ट्रातील गायरान शासकीय पड जमिनीवरील भूमिहीन अतिक्रमणधारक ज्यांच्या विरोधात सर्व जिल्हयातील जिल्हा कलेक्टर यांनी इव्हिक्षण नोटीसा काढलेल्या आहेत असे अतिक्रमणधारक सुध्दा राज्यभरातून या मोर्चात मोठया संख्येने सामील होणार आहेत. मात्र शासकीय जमिनीवरील धन दांडग्यांचे व सत्तधीशांचे अतिक्रमण त्वरित हटविलेच पाहिजे ही सुध्दा पक्षाची अधिकृत भूमिका आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे यापुढे सातत्याने व संघर्षशील मार्गाने तसेच कायदेशीर लढाई या मार्गाने महाराष्ट्रातील भूमिहीन लोक, प्रकल्पग्रस्त विस्थापित लोक यांच्याकरता घरे व शेतीसाठी जमीन यासाठी सातत्यपूर्ण अटीतटीचा संघर्ष करणार आहे याची पक्षाध्यक्ष म्हणून मी स्वतः ग्वाही देत आहे. त्याकरिता राज्य शासनाच्या विविध योजना उदाहरणार्थ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना यामध्ये सुध्दा आवश्यक सुधार करून राज्य शासनाला या योजना राबविण्या साठी पक्षातर्फे विनंत्या, बैठका, अर्जाशिवाय कायद्याच्या मार्गाने भाग पाडले जाईल हे सुध्दा शासनाने लक्षात घ्यावे.

सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण होता कामा नये माध्यमातून हंगामी नोकर भरती होता कामा नये ही एक अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा असल्यामुळे राज्य शासनातील अनेक कंत्राटी कर्मचारी, कामगार देखील या मोर्चामध्ये मोठया संख्येने सहभाग घेणार असून इतर दहा मुद्दाच्या आधारे वेगवेगळे समाज घटक या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. याशिवाय या मोर्चासाठी या मोर्चातील प्रमुख १२ मागण्या समर्थनार्थ जे राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक संघटना या संवेदनशील असून सहमत आहेत त्यांनाही पक्षातर्फे त्यांच्या झेंडा, दांडा, बॅनर यासह मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा विराट मोर्चा २३ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता पवित्र दीक्षाभूमीला अभिवादन करून यशवंत स्टेडीयम, धंतोली येथून विधानसभा अधिवेशनावर हल्लाबोल करणार आहेत.

बी.आर.एस.पी. चा हा विराट मोर्चा विदर्भात होत असल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती याचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पार्टीचे पक्षातर्फे वाभाडे काढण्यात येणार असून विदर्भवादी देवेंद्र फडणवीस सरकारला त्यांच्या अनेक भाषणांची व वचनाची आठवण करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विकासासाठी विदर्भ राज्याची निमिर्ती आवष्यक नाही काय हा जाहीर सवाल आहे. शेतकऱ्यास वय वर्ष ६० नंतर मासिक ५०००/- रू पेन्शन योजना, बहुजन महापुरूषांच्या संघर्षाचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मारकांचे त्वरित निर्माण, अति प्रचंड बेकारी वर उपाय म्हणून राज्य शासनातर्फे त्वरित शासन कर्मचारी भरती, शेतकरी अवाजवी वीज बिलांची माफी, आदिवासी हिताचा पेसा कायदा १०० टक्के अंमलबजावणी, मराठवाडयाचे आर्थिक मागासलेपण दूर करण्याकरिता व मराठवाडयाच्या विकासाकरिता विशेष आर्थिक तरतूदीची गरज, राज्यात ओबीसींची जनगणना, राज्यातील बहुजन विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन संपूर्ण वस्तीगृहांचे व आश्रम शाळांचे आधुनिकरण व प्रत्येक जिल्हयामध्ये वस्तीगृह निर्मिती शिवाय या वस्तीगृह टेंडर मध्ये देखील बहुजनांचा सहभाग, सर्व प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन, मुस्लिमांसाठी प्राध्यापक रहमान कमिशन अहवालानुसार मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेले पाच टक्के शैक्षणिक आरक्षण, एस. सी, एस. टी. च्या राजकीय आरक्षण धोरणाचा पुनर्विचार, महागाईने कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रातील माणसाच्या हितासाठी राज्य सरकारने डिझेल, पेट्रोल, बियाणे, खते एलपीजी सीएनजी, खाद्यतेल, स्वयंपाक गॅस अशा महत्वपूर्ण जीवनावश्यक बाबीवरील राज्य कर कमी करणे, भारतीय जनता पार्टी नेत्यांच्याव्दारे महापुरूषांच्या अपमान याचा तीव्र निषेध, राज्यातील महात्मा बसवेश्वर यांच्या अनुयायांच्या मागणीनुसार लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून राज्य शासनाची मान्यता तर विदर्भातील गडचिरोली जिल्हयाचे विभाजन करून अहेरी नावाच्या नव्या जिल्हयाचे निर्माण व सुरजागड प्रकल्पागृस्तांच्या समस्यांचे ताबडतोब निराकरण अशा अनेक ज्वलंत मुद्यांवर पक्षातर्फे शासनाला मोर्चाव्दारे दिले जाणारं आहे. असे सुरेश माने यांनी म्हटले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन पाळले ; “ईडी’ सरकारवर अण्णा खुश
Next Article भीमा कोरेगाव प्रकरणातील केसेसही मागे घ्या- रामदास आठवले यांची शिंदे- फडणवीस सरकारडे मागणी
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.