पुणे जिल्हा प्रतिनिधी :- बबनराव धायतोंडे
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे पहिल्या पंधरावड्याचे बिल .शेतकऱ्यांच्या। खात्यावर जमा झाले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांनी दिली.
मशरूम ची शेती म्हणजे मालामाल कार्यक्रम; होतो लाखो रुपयांचा फायदा !
भीमा- पाटस कारखान्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या ३५ हजार टनाचे २५०० रुपये प्रति टनाप्रमाणे पाहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

तसेच ऊस तोडणी वाहतुकीचे बिलही प्रत्येकी दहा दिवसानंतर अदा करण्यात आलेले आहे .कारखान्याने आज दि.५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे गाळप केले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा आमदार कुल यांनी केले.
