महालोकवाणी न्यूज:-
16 जानेवारी 2023 :–
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवरून महाविकासआघाडीमध्ये खडाखडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी झालेल्या गोंधळावरून आणि शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे. तसंच यापुढे असं होणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

या कारणामुळे नाराजी..
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवरून महाविकासआघाडीमध्ये खडाखडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी झालेल्या गोंधळावरून आणि शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे.
या निवडणुकांसाठी अमरावती आणि नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार, कोकणात शेतकरी कामगार पक्ष, नागपुरात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीला तिकीट देण्याचं महाविकासआघाडीचं ठरलं. यातल्या नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आधीपासूनच आग्रही होती, पण चर्चेनंतर ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाचही जागांपैकी एकाही जागेवर शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही.
एकत्र बसून सुरूवातीला चर्चा झाली त्यानुसार नागपूर शिवसेनेसाठी सोडलं होतं, पण प्रत्येक वेळी त्याग करण्याची जबाबदारी शिवसेनेवरच असते. विरोधकांचं ऐक्य वगैरे या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही त्याग करत आलो, पण यापुढे असं होणार नाही. यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू,’ असा इशारा संजय राऊत यांनी महाविकासआघाडीला दिला आहे.
