Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ अपात्र करण्याची मागणी

योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ अपात्र करण्याची मागणी

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 16, 2023Updated:January 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पुणे जिल्हा प्रतिनिधी:- बबनराव धायतोंडे

महालोकवाणी न्यूज:-

डिकसळ ता.इंदापुर येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंडळ अपात्र करण्याची मागणी या संस्थेचे सभासद माजी.व्हाईस चेअरमन सोमनाथ चंद्रकांत भादेकर यांनी केली आहे.याबाबत सोमनाथ भादेकर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था इंदापूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ( ग्रामीण) येथे रितसर तक्रार केली आहे.

भादेकर यांच्या तक्रारी अर्जात मौजे डिकसळ तालुका. इंदापूर येथील योगेश्वरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची सन २०२१ -२२ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नसून रितसर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत आपण संस्थेच्या पंचकमिटीला वारंवार तोंडी मागणी करत असताना देखील पंचकमिटीने वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही. संस्थेचे सभासद हे संस्थेचे मालक असतात तरीही सभासदांनसमोर चालू वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल, ताळेबंद न ठेवता बेकायदेशीरपणे लाभांश वाटप केला आहे.

या कारणामुळे महाराष्ट्र सहकारी अधिनियम कायद्यानुसार संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सोमनाथ भादेकर यांनी केली आहे.
याबाबत संस्थेचे चेअरमन कैलास कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि,सभासदांना लाभांश वाटप करण्याचा विषय मासिक सभेत घेतला होता सर्व संचालकांनी मान्यता दिल्यानंतरच लाभांश वाटप करण्यात आला.तसेच दरम्यानच्या काळात डिकसळ ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने आचारसंहिता लागेल म्हणून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास विलंब झाला. तसेच .संस्थेचे सचिव श्रीयुत जगताप .यांना संपर्क केला असता ते म्हणाले माझ्या मुलीचे लग्न असल्याने मी लग्नाच्या कार्यात व्यस्त होतो त्यामुळे मला वार्षिक सर्वसाधारण सभा घेता आले नाही.

म्हणून मी सहाय्यक निबंधक इंदापूर यांच्या कडे मुदत वाढीचा अर्ज केलेला आहे .याबाबत साहाय्यक निबंधक इंदापूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले योगेश्वरी सहकारी संस्थेला आम्ही रितसर खुलासा मागितला आहे खुलासा आल्यानंतर त्यांना वाजवी मुदत दिली जाईल व सबळ पुरावा व तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास संचालक मंडळावरती कारवाई होऊ शकते व सचिवांना पाच हजार रुपये दंड होण्याची सहकार कायद्यात तरतुद आहे ..त्यानूसार योग्य ती कारवाई केली जाईल असे ते म्हणाले…

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleराष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत खानवटे तालुका दौंड येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर
Next Article यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू ! संजय राऊत यांनी दिला महाविकास आघाडीला इशारा…
mahalokwani
  • Website

SSC Result 2026 |दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार? आज दुपारी लागणार Ssc चा निकाल!

massajog | भावनिक लाटेला धक्का! मस्साजोगच्या रणात ‘या’ उमेदवाराची बाजी

ashok kharat| SIT चौकशीदरम्यान अशोक खरातची प्रकृती बिघडली; कार्डियाक ॲम्बुलन्सद्वारे वैद्यकीय तपासणी

sandip gaikawad | संदीप गायकवाडांना जामीन मंजूर; अॅड. पवार यांनी मांडली बाजू

Ashok Kharat case | अशोक खरात प्रकरणात तपासाला वेग; रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.