दिनांक 5 जाने :
झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. पारसनाथ टेकडी समेद शिखर म्हणून प्रसिद्ध आहे, जगभरातील जैनांमध्ये हे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे. झारखंड सरकारच्या या निर्णयाविरोधात जैन समाजाचे लोक देशभरात निदर्शने करत आहेत. या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे. या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नका, प्रसंगी केंद्राने यात हस्तक्षेप करावा,

झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील, अशी जैन बांधवांची भावना आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने यात त्वरित हालचाल करावी, असेही राज ठाकरे म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे.
झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे.
