पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय खेड तालुका कर्जत व इंडसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खानवटे तालुका दौंड येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दिनांक 15 ते 21 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न होत आहे.माननीय डॉ.वैशाली अजोतीकर आणि प्रा. अतिश नाईकवाडे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल गदादे ,प्रा संतोष शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली 100 (शंभर) स्वंयसेवकांसह

श्रीराम विकास सोसायटीचे चेअरमन विलास पवार. तंटामुक्ती अध्यक्ष दिपक ढवळे. खानवटे विकास सोसायटीचे माजी चेअरमन बापूराव झोंड. ग्रामपंचायत .वैभव लोखंडे . सदस्य अर्जुनराव गायकवाड.आण्णासाहेब लोखंडे. ग्रामसेवक कांबळे . ईत्यादी.पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे आयोजित शिबीर राबविले जात आहे. सदर शिबिरामध्ये संपूर्ण आरोग्य सर्वेक्षण, स्मशानभूमी परिसर स्वच्छता’ ग्राम स्वच्छता. शाळा परिसर.मंदिर परिसर. खानवटे गावाचे शिवारात 500 झाडांना पाण्याची आळी(वाफे) लावून शिबिर संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज या निवासी शिबिर संपन्न होत असताना

महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रांसह, प्राचार्य . डॉ.धर्मेंद्र साळवे, डॉ. अपर्णा टेंबुलकर,प्रा. निलीया मूर्ती,प्रा. नवनाथ धवडे हे सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तसेच सौ शितल भोसले. श्री अंकुश शेटे. व खानवटे गावच्या सरपंच जयाताई खुटाळे .उपसरपंच अभय राजे भोसले. माजी सरपंच अर्जुन बापू शिरसट .खानवटे विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत पवार. माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश माहुरकर.
