क्रिकेटपटू आणि अभिनेत्रींच्या नात्याची चर्चा अनेक वेळा सोशल मीडियावर होत असते. काही अभिनेत्रींच्या क्रिकेटर्ससोबतच्या लव्ह स्टोरीज अनेकांना माहित असतील. अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगत असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शुभमन गिल सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिच्यासोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा रंगत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली हि पोस्ट खरी आहे कि खोटी, चला तर मग जाणून पोस्ट मागचं सत्य काय ?
ऐकावं ते नवलंच; चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही ‘या’ शहरात पाळली जाते परंपरा..
न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यानंतर शुभमन तुफान चर्चेत आहे. या सामन्यानंतर शुभमन गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. यामध्ये शुभमन बसमध्ये बसलेला दिसत आहे. तेव्हा एक चाहता त्याच्याजवळ येतो आणि त्याचा हात धरतो आणि सचिनची काळजी घेण्यास सांगतो. चाहत्याने हे सांगताच शुभमनचा चेहरा लाजेने लाल झालेला पाहायला मिळतोय.
दरम्यान या अगोदर हि एका सामन्यात शुभमन फिल्डिंग करत असताना चाहते सारा-सारा म्हणून ओरडताना दिसले होते. मात्र आता जेव्हा शुभनम गिलने न्यूझीलंडविरुद्ध आपले द्विशतक पूर्ण केलं तेव्हापासून सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट करताना कॅप्शनमध्ये शुभमन आणि सारा तेंडुलकर साखरपुडा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण हे पूर्णपणे फेक असून निव्वळ एक अफवाच आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खान हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. एका मुलाखतीमध्ये शुभमन याला आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शुभमन याने सारा अली खान हिचं नाव घेतलं. एवढंच नाही तर साराला डेट करत आहेस का? असा प्रश्न देखील क्रिकेटरला विचारण्यात आला. या प्रश्नावर शुभमन म्हणाला, ‘शायद हा शायद ना…’ या उत्तरानंतर शुभमन तुफान चर्चेत आला. शिवाय सारा देखील शुभमन यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. पण साराने यावर मौन बाळगलं आहे. त्यामुळे शुभमन सारा अली खान हिला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पृथ्वी शॉचे झंझावाती त्रिशतक, रणजी ट्रॉफीत ६ वर्षात जे घडले नाही ते पृथ्वीने करून दाखवले !
दरम्यान सारा खान आणि शुभमन गिल यांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलंय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांना एकत्र फिरताना पाहिलं होत. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिप आहेत या चर्चांना देखील उधाण आलं. मात्र शुभमनच्या आयुष्यातील सारा नक्की कोणती हे येणारा काळचं ठरवेल.
