Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » श्री बालाजी स्वयं सहाय्यता बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वृत्तपत्र विक्रेत्यांना बचत गटाचा मोठा आधार -विजय मते

श्री बालाजी स्वयं सहाय्यता बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न वृत्तपत्र विक्रेत्यांना बचत गटाचा मोठा आधार -विजय मते

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 3, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


नगर – आपण जे काम करतो ते स्वत:ला फार अवघड वाटते व समोरचा जे काम करतो ते खूप सोपे आहे, असा दृष्टीकोन प्रत्येकाचा असतो. प्रत्येक कामात कष्ट आहे, वृत्तपत्र व्यवसायात कठोर परिश्रमाशिवाय पर्यायच नसतो. या व्यवसायामुळे कष्टाची किंमत समजते. तेव्हा तर आपण चिकाटीने बचत करतो. 15 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या बालाजी स्वयं सहाय्यता बचत गट एक खूप मोठा आधार आपल्याला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते विजय मते यांनी केले.


सावेडी उपनगरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या श्री बालाजी स्वयं सहाय्यता बचत गटाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी 15 वर्षे यशस्वीपणे जबाबदारी पार पाडणारे अध्यक्ष संदिप लंके व सचिव पुरुषोत्तम दोमल यांचा विशेष सत्कार श्री.मते यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ऋषीकेश लखापती, प्रसाद लिमये, पुरुषोत्तम बेत्ती, विजय गव्हाणे, सुनिल सिद्दम, सुभाष संदीप गोफने काकडे, तुळशीराम जगधने, राहुल भालेराव, दत्तात्रय म्याना, सागर गाजेंगी, प्रशांत शिरापुरी, नितिन हंडोरे आदि उपस्थित होते.


श्री.मते पुढे बोेलतांना म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांनी आर्थिक गरज ओळखून स्थापना केली होती. या बचत गटामुळे विक्रेत्यांना बचत करण्याची सवय लागली. आई-वडिलांना घरातील सदस्यांना आजारपणासाठी, स्वत:चे घर घेण्यासाठी, मुला-मुलींच्या लग्नासाठी हक्काच्या कर्जाची सोय झाली. नियमित सर्व सदस्यांनी कर्ज वेळेत फेडले, त्यामुळे बचत गट प्रगती पथावर राहिला, असे सांगितले.
या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. ऐनवेळी आलेल्या महत्वाच्या विषयाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. सूत्रसंचालन राहुल भालेराव यांनी केले तर दत्तात्रय म्याना यांनी आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleकर्करोगाशी झुंज अपयशी, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
Next Article नववर्षानिमित्त भाविकांना अल्पदरात गजानन महाराज दर्शनाचा लाभ देणार – सुनिल त्र्यंबके
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.