नगर – प्रत्येक कॉलनीत, सोसायटीत आता अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार वाढत आहे. विविध देव-देवतांची मंदिरे, अखंड हरिनाम सप्ताह, नित्यनियमाने होणारे धार्मिक कार्यक्रमांमुळे नागरिक एकत्र येतात. यामुळे सामाजिक एकता, प्रेम टिकते अशा अध्यात्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास होणे अपेक्षित आहे.
सावेडी उपनगरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्यावतीने मनपा सभागृह नेतेपदी विनित पाउलबुधे यांची तर स्थायी समिती समिती सदस्यपदी निवड झालेले सुनिल त्र्यंबके यांचा तसेच वेळोवेळी मंदिर उभारणीसाठी, प्रवेशद्वाराकरीता सहकार्य करणारे माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांचा व माजी जि.प.सदस्य बाळासाहेब सोनवणे यांची जिल्हा फेडरेशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सुनिल मानकर, जितेंद्र चत्तर, बाबासाहेब मरकड, गिरिश धर्माधिकारी, संतोष उपाध्ये, पंकज गुजराथी, निखिल देवरे, शशी मुळे, आदिनाथ म्हस्के, रमेश म्याना, संजय देशपांडे, विजय तिमोने, विनायक पवळे आदिंसह भाविक उपस्थित होते.

श्री.पाउलबुधे पुढे म्हणाले, मंदिराच्या ओपनस्पेसमध्ये सुशोभिकरण करुन जेष्ठांसाठी बैठक व्यवस्था तर लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यासाठी पाठपुरावा करु. मनपाच्या माध्यमातून सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनिल मानकर यांनी आभार मानले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
