लवकरात लवकर कारवाई न केल्यास दि. २० जानेवारी रोजी ग्रामस्थ करणार रास्ता रोको आंदोलन….!
शेवगाव/प्रतिनिधी ( इसाक शेख )
दि. १०/०१/२०२३
शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सन २०२१-२२ या कालावधीत विविध विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करून दोषींवर १५ दिवसात कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती. अन्यथा शुक्रवार दि.२० जानेवारी २०२३ रोजी शेवगाव- गेवराई रोडवर सुकळी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी लेखी मागणी मौजे सुकळी येथील ग्रामस्थांच्या वतीने तसेच प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लहूराव भवर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील मौजे सुकळी येथील सन २०२१-२२ या कालावधीत ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी या दोन वर्षात झालेल्या विविध विकास कामात अफरातफर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे. यामध्ये १५ वा वित्त आयोगाच्या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या खात्यावरून विद्यमान सरपंच यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता तसेच विश्वासात न घेता ग्रामपंचायतीच्या बँक अकाऊंट मधुन १ लाख ६८, हजार ४८ रूपये काढण्यात आलेले आहेत.

गावठाण वस्तीमधील दलीत वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे पुर्ण बिले काढून देखील अद्यापही टाकीचे काम अपुर्ण अवस्थेत आहे. अंगणवाडी पाणी फिल्टरचे काम अपुर्ण अवस्थेत असताना देखील त्याचे पुर्ण बील काढण्यात आलेले आहे. सार्वजनिक शौचालयाचे काम अपूर्ण असताना देखील त्याचे पूर्ण बील काढण्यात आलेले आहे. पालकमंत्र्याच्या निधीतून मंजूर होऊन आलेले विविध विकास कामाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला मजुरीसाठी जाणीवपूर्वक दिलेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या चालु असलेल्या वर्ग खोल्याच्या तसेच पंचायत समिती शेष फंडातील कामाच्या इंस्टिमेंटची मागणी सरपंच व ग्रामस्थांनी ग्रामसेवक यांच्याकडे वेळोवेळी केली असता ती देण्यास ग्रामसेवक यांनी टाळाटाळ केली.
आपण बँक लोन साठी पात्र आहात की नाही असे चेक करा
गावात सार्वजनिक शौचालये झालेली नसताना देखील त्या शौचालयाचे रू. ९३ हजार ४४ रूपयाचे बिले काढून ती शौचालये कुठे बांधली आहे याची माहिती मिळणे बाबत. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेची प्रतिक्षायादी कोणती आहे ती सरपंच व ग्रामस्थांना याची माहिती अद्यापही कळविण्यात आलेली नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळाची मुतारीच्या दुरुस्तीसाठी १ लाख ८५ हजार ६३७ रूपये बील काढून सदरील काम हे निकृष्ट झाले असून त्याची चौकशी करण्यात यावी. डिसेंबर महिन्याची मासिक सभा जाणीव पूर्वक न घेणे.
फळबागेचे ठराव व मोहगणी ठराव, विहीर ठराव, ग्रामसेवकाने सरपंच व ग्रामस्थांना विश्वासत न घेता परस्पर केलेले आहेत. गावातील दिवे लावलेले व मुरूम भराव केलेले बील जाणीव पूर्वक न काढणे. विविध विकास कामे करत असतांना सरपंच व ग्रामस्थांना चुकीची माहिती देऊन दिशाभुल करणे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सुकळी या गावात अंदाजे २०० च्या आसपास निकृष्ट दर्जाचे शौचालय बांधुन प्रत्येकी १२ हजार रूपये अनुदान घेऊन लाखो रूपये हडप केलेले आहेत. तरी वरिल सर्व बाबीच्या कामाची योग्य यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर १५ दिवसात कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती.
अन्यथा शुक्रवार दि.२० जानेवारी २०२३ रोजी शेवगाव- गेवराई रोडवर सुकळी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. असेही दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. सदरील निवेदनावर विद्यमान सरपंच मायाताई भवर, सामाजिक कार्यकर्ते लहूराव भवर, संदीपराव गालफाडे, प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, अनिल देशमुख, बाळासाहेब गरड, सतीश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ काळे, अरुण ससाने, विकास देशमुख, बळीराम भवर, कडूभाऊ भवर, सुनील गरड, महादेव भवर, विजयसिंह घोडके, सुनील गरड, बद्रीनारायण देशमुख, अण्णासाहेब होटकर, भीमसेन भवर श्रीपती गरड, सर्जेराव काळे, ज्ञानदेव गायकवाड, भाऊसाहेब भवर यांच्यासह आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच सदरील निवेदनाच्या प्रति ह्या जिल्हाधिकारी अहमदनगर, जिल्हा पोलीस अधिक्षक, तहसिलदार शेवगाव, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, विनोदसिंग परदेशी जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना, लक्ष्मीताई तात्यासाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत.
