Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न..! कोणी केला वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न..! कोणी केला वाचा सविस्तर

mahalokwaniBy mahalokwaniMarch 16, 2023Updated:March 16, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

महालोकवाणी न्यूज:

ब्लॅकमेलिंगचा प्रयत्नअमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका फॅशन डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहितीही दिली.

माझ्या पत्नीने या प्रकरणाचा एक एफआयआर दाखल केला आहे. तिच्यावर दबाव आणून माझ्यामाध्यमातून काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. आधी पैशाची ऑफर दिली. नंतर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती गेल्या सात ते आठ वर्षापासून फरार आहे. त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे आहेत. त्याची एक मुलगी आहे. शिकलेली आहे. हुशार आहे. ही मुलगी 2015-16च्या दरम्यान अमृताला भेटत होती. नंतर तिचं येणं बंद झालं. अचानक 2021 मध्ये या मुलीनं माझ्या पत्नीला भेटणं सुरू केलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

विश्वास संपादन केला

त्यानंतर तिने मी डिझायनर आहे, असं सांगणं सुरू केलं. मी डिझायनिंगचे कपडे तयार करते. माझा बिझनेस सुरू आहे. मी आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करते. आणि त्यासोबत बेस्ट 50 पॉवर फुल वूमनमध्ये माझं नाव आलं आहे, असं तिने सांगितलं. त्यानंतर ती म्हणाली माझी आई वारली. मी तिच्यावर पुस्तक लिहिलं आहे. तुम्ही त्याचं प्रकाशन करा त्यानंतर तिने घरच्या घरी पुस्तकाचं प्रकाशन करून घेतलं. असा विश्वास संपादित करून घेतला. हा विश्वास संपादित केल्यानंतर काही दिवसांनी तिनं येणं जाणं सुरू केलं. कधी म्हणायची माझे डिझायनर क्लोथ वापरा. ती माझ्या पत्नीला डिझायनर कपडे वापरायाल द्यायची. त्यामुळे तिने आमचा अजून विश्वास संपादित केला

एक कोटीची ऑफर दिली

हळूच एक दिवस तिने सांगितलं, माझ्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये फसवण्यात आलंय. त्यांना सोडवा. त्यावर माझी पत्नी म्हणाली, तुझं काही निवेदन असेल तर तू यांना देऊन टाक. सरकार बदलल्यावर तिने हे सांगितलं. तोपर्यंत ती विश्वास संपादन करत होती. काही दिवसाने तिने सांगित २ की माझे वडील सर्व बुकींना ओळखतात. आम्ही बुकींची माहिती द्यायचो. त्यावरून रेड व्हायची आणि त्यातून आम्हाला पैसे मिळायचे. तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड टाकू.तिचं हे बोलणं माझ्या पत्नीने गांभीर्याने घेतलं नाही. तिला सांगितलं या गोष्टी आम्हाला सांगायच्या नाहीत. आम्ही या फालतू गोष्टीत पडणार नाही. तिने हा धंदा केला तर फायदा होईल असं सांगितलं. माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी देईल. त्यांची सुटका करा, अशीही ती म्हणाली

एफआयआर आला आणि…

कोणताही एफआयआर जास्त दिवस लपून राहत नाही. दोन दिवसानंतर तो कोर्टात द्यावा लागतो. त्यामुळे हा एफआयआर सार्वजनिक झाला. एका वर्तमानपत्राने त्याची बातमी केली. एफआयआर बाहेर आला नसता तर आम्ही आरोपींना पकडण्यात यशस्वी झालो असतो. कारण पोलिसांनी सागितलं आपण त्यांना एंगेज करू. त्यानंतर आरोपीने ए संभाषणात आपण चुकीने हे केल्याचंही कबूल केलं. आमच्यावरच्या केसेस मागे घेण्यासाठी हे केल्याचं त्यांनी सांगितलं, अशी माहितीही त्यांनी दिली.

अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली

मागच्या सरकारने माझ्या वडिलांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पण सरकार बदलल्याने ती प्रक्रिया थांबली. तुम्ही ते बंद केलं. म्हणून आम्हाला तुम्हाला ब्लॅकमेल करावं लागलं, असं या मुलीने सांगितलं. हे सांगताना त्यांनी काही बड्या नेत्यांची नावे सांगितले आहेत, पण ते नावे वेळ आल्यावर उघड करणार आहे,

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleनिलेश (भाऊ) गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त अ‍ॅड. मयूर डोके यांच्या तर्फे बालघर प्रकल्पातील अनाथ मुलांना शालेय साहित्य देऊन साजरा
Next Article अहमदनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केली स्थापना !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.