Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » रोहित पवारांच्या अडचणीत वाढ, अखेर बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल; राम शिंदेंनी केलेली तक्रार !

रोहित पवारांच्या अडचणीत वाढ, अखेर बारामती ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल; राम शिंदेंनी केलेली तक्रार !

mahalokwaniBy mahalokwaniMarch 18, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती येथील ॲग्रो कारखान्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखान्यांबाबत सरकारने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांच्या साखर कारखान्याने तारखे आधीच गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्री समितीच्या निर्णयाचे उल्लंघन करून गाळप केल्याने बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर कलम 188अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी गाळप हंगाम सुरू केल्याचा दावा भाजप नेते, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केला होता. यानंतर साखर आयुक्तालयांतर्गत विशेष लेखापरीक्षक यांच्यामार्फत या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले. मात्र, त्यांच्या अहवालात विसंगती आढळल्याने लेखापरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर दि. 8 मार्च 2023 रोजी भिगवण पोलिसांत बारामती ॲग्रोचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या मंत्री समितीच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोबरनंतर ऊस गाळप हंगाम सुरू करावयाचा होता; मात्र बारामती ॲग्रोने 10 ऑक्टोबर 2022 रोजी हंगाम सुरू केला, अशी तक्रार दाखल झाल्यानंतर अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी दि. 7 डिसेंबर 2022 मध्ये चौकशी अहवाल सादर केला. त्यामध्ये बारामती ॲग्रो या साखर कारखान्याने मंत्री समितीच्या निर्णयाचे व साखर आयुक्त कार्यालयाच्या परिपत्रकाचे उल्लंघन केल्याचा ठपका गुळवे यांच्यावर ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड तालुका कर्मचारी कृती समितीच्या अध्यक्ष पदी युवराज पाटील तर सचिव ज्ञानेश्वर कोळेकर
Next Article मुख्यमंत्री सहायता निधीतून जामखेडमधील रुग्णाला मोठं अर्थसहाय्य; आ.प्रा.राम शिंदे यांच्या प्रयत्नाला यश !
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.