Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला कर्जत-जामखेडसाठी तब्बल 5 कोटी रूपयांचा निधी मंजुर; आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश.!

देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला कर्जत-जामखेडसाठी तब्बल 5 कोटी रूपयांचा निधी मंजुर; आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश.!

mahalokwaniBy mahalokwaniMarch 24, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

कर्जत-जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी भरीव निधी देण्याची घोषणा नुकतीच केली होती.अवघ्या 15 दिवसांच्या आत ही घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरी करून दाखवली आहे. त्यांनी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी तब्बल 5 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अर्थात जो जसा बोलतो तसा वागतो याचाच प्रत्यय यानिमित्ताने कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेला आला आहे.

कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिर परिसराचा प्रादेशिक पर्यटन योजनेतून विकास व्हावा, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती. या मागणीनुसार आमदार प्रा राम शिंदे यांनी काही दिवसांपुर्वी संत गोदड महाराज मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पर्यटन विभागाकडे विकास कामांचा प्रस्ताव पाठविण्याचा शब्द दिला होता, त्यानुसार आमदार प्रा.राम शिंदे यांनी गोदड महाराज मंदिर परिसराचा परिपूर्ण प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. त्यातच 11 मार्च 2023 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी गोदड महाराज मंदिराला भेट देऊन गोदड महाराजांचा आशिर्वाद घेतला होता.

त्यानंतर पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील पर्यटनस्थळांसह गोदड महाराज मंदिर परिसराचा प्रादेशिक पर्यटन योजनेतून विकास करण्यासाठी भरीव निधी देण्याची घोषणा केली होती.अवघ्या 15 दिवसाच्या आत फडणवीस यांनी ही घोषणा खरी करून दाखवली आहे. कर्जत येथील श्री संत गोदड महाराज मंदिरासाठी तब्बल 3 कोटी 50 लाख रूपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत मतदारसंघासाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. तसा शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून 23 मार्च 2023 रोजी जारी करण्यात आला आहे.

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील 2 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिर परिसरात विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारने 3 कोटी 50 लाखांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून संत गोदड महाराज मंदिर परिसरात भाविकांसाठी प्रवेशद्वार, पाण्याची टाकी, सभामंडप, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे, परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण करणे सह आदी कामे केली जाणार आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी निकाली निघाली आहे. यामुळे कर्जत शहरातील जनता आणि भाविकांमधून आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी आमदार प्रा.राम शिंदे नेहमी जामखेड तालुक्यातील मोहरी येथे जात असतात. या देवस्थानचा प्रादेशिक पर्यटन योजनेतून विकास व्हावा अशी मागणी मोहरी ग्रामस्थ आणि भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत आमदार प्रा.राम शिंदे यांनी मोहरी येथील जगदंबा देवस्थानचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. आमदार राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत मोहरी येथील श्री क्षेत्र जगदंबा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून 1 कोटी 50 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून भाविकांसाठी प्रवेशद्वार, पाण्याची टाकी, सभामंडप, महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, परिसरातील रस्ते काँक्रीटीकरण व सुशोभीकरण, मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे ही कामे केली जाणार आहेत.

आमदार प्रा राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी सरकार दरबारी असलेले राजकीय वजन वापरून गेल्या काही दिवसांत 130 कोटी रूपयांहून अधिकचा निधी खेचून आणला आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात हाती घेतलेल्या विकासाच्या या झंझावातामुळे मतदारसंघातील जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जनतेत आमदार प्रा.राम शिंदे यांची लोकप्रियता वाढू लागली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSuv Tata Punch आता सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये उपलब्ध; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून.!
Next Article Rahul Gandhi : काँग्रेसला मोठा धक्का, राहुल गांधींची खासदारकी रद्द ! वाचा नेमकं प्रकरण काय ?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.