Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » कर्जत-जामखेड मतदारसंघातील १० हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना होणार मोफत सायकलचे वाटप- आमदार रोहित पवार

कर्जत-जामखेड मतदारसंघातील १० हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना होणार मोफत सायकलचे वाटप- आमदार रोहित पवार

mahalokwaniBy mahalokwaniMarch 25, 2023Updated:March 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

या अनोख्या सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजितदादा पवार राहणार उपस्थित

जामखेड प्रतिनिधी धनराज पवार

कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवून आमदार रोहित पवार हे आपल्या मतदारसंघात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व बारामती ऍग्रो लिमिटेड आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या सहकार्याने तब्बल १० हजार गरजू शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवारही उपस्थित असणार आहेत.

कर्जत शहरातील फाळके पेट्रोल पंपा शेजारील मैदानावर हा सोहळा 26 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आलेला असून सर्व लाभार्थी पाचवी ते दहावीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.

पर गावाहून वाड्या-वस्त्यांवरून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात काही ठिकाणी एसटीची ही सोय नसते आणि सायकल घेऊन देण्याची कुटुंबाची परिस्थिती नसते. अशा परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊन त्यांच्या उज्वल भवितव्यावरही विपरीत परिणाम होत असतो हीच गोष्ट लक्षात घेऊन गरजू विद्यार्थ्यांना सायकल देऊन त्यांची शाळेत येण्या-जाण्याची सोय व्हावी व शाळेत येण्या-जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून गरजू विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येणार आहेत.

Advt5

विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक प्रवाहात राहावं, शिक्षण घेत असताना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी आमदार रोहित पवार हे वेळोवेळी वैयक्तिक लक्ष देऊन असतात. मतदारसंघात अनेक शाळांमध्ये दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतं. किंवा मिळेल त्या वाहनाने प्रसंगी प्रवास करावा लागतो. यामुळे आता सायकल उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची ओढ आणखी वाढेल शिवाय त्यांना होणारा शारीरिक आणि मानसिक त्रासही या माध्यमातून कमी होणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleपारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबदल विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी केले सन्मानीत
Next Article खानवटे तालुका दौंड येथे रेल्वे रुळावर सापडला अनोळखी तरूणाचा मृतदेह; हत्या की आत्महत्या.?
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.